Join us  

फुफ्फुस आणि यकृताला गोळी लागूनही विशालला जीवनदान

By admin | Published: May 10, 2017 12:02 AM

मित्राची बर्थ डे पार्टीत दारूच्या नशेत केलेला गोळीबार १८ वर्षीय विशालच्या जीवावर बेतला होता. परंतु, सुदैव्याने कल्याणमधील

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मित्राची बर्थ डे पार्टीत दारूच्या नशेत केलेला गोळीबार १८ वर्षीय विशालच्या जीवावर बेतला होता. परंतु, सुदैव्याने कल्याणमधील खाजगी रुग्णालयात त्याच्यावर वेळीच व योग्य उपचार झाल्याने त्याला नवीन आयुष्य मिळाले आहे. विशालच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्याला लवकरच घरी सोडण्यात येणार आहे.विशाल हा २७ एप्रिल रोजी मित्रांसोबत मित्राच्याच बर्थ डे पार्टीला गेले होता. पार्टी सुरू असताना, विशालच्या एका मित्राने दारु च्या नशेत असताना, चेष्टेत बंदुकीचा छरा ओढला आणि भोवताली फिरवायला सुरूवात केली. ती बंदूक पूर्णपणे गोळयांनी भरलेली असल्याची जाणीव त्याला नसतानाच, ट्रिगर दाबला गेला आणि गोळी थेट विशालच्या छातीत घुसली. त्याला त्वरीत उल्हासनगर येथील स्थानिक रु ग्णालयात नेले. यावेळी प्राथमिक उपचारात विशालच्या फुफ्फुस आणि यकृताला गंभीर दुखापत झाल्याने अंतर्गत रक्तस्त्राव सुरू झाल्याचे समोर आले. तसेच त्या रुग्णालयात उपचारासाठीची आवश्यक सामुग्री उपलब्ध नसल्याने त्याला तातडीने कल्याणमधील खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी विशालला अंतर्गत रक्तस्त्राव मोठया प्रमाणात झाल्याने रक्ताच्या गाठी होण्यास सुरूवात झाल्याने त्याची प्रकृती खालविण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे रु ग्णालयातील जनरल व लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अशोक बोरिसा यांच्या देखरेखीखाली शस्त्रक्रिया केली. आणखी नुकसान टाळण्यासाठी तसेच, फुफ्फुसे व यकृतातील सुधारणेचे परिक्षण करण्यासाठी इंटरकोस्टल ड्रेन (आयसीडी) म्हणजेच एक लांब ट्यूब विशालच्या छातीत सोडण्यात आली. आयसीडी या लवचिक प्लास्टिकच्या ट्यूबमुळे छातीत साठून राहिलेले रक्त, पित्त, पस आणि अन्य टाकाऊ घटक बाहेर टाकण्यास तसेच, रु ग्णाला नीट श्वास घेण्यासाठीही मदत होते. तपासण्या आणि उपचारांमुळे विशालला नवीन आयुष्य मिळाले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय विशालवर योग्य शस्त्रक्रिया पार पडली आहे.