रेल्वे फाटकाजवळ वाहनांसाठी लिफ्ट

By admin | Published: April 20, 2016 05:58 AM2016-04-20T05:58:38+5:302016-04-20T05:58:38+5:30

ध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात असणाऱ्या फाटकामुळे लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागत आहे. त्यामुळे फाटक बंद करून रोड ओव्हर ब्रिज बांधला जाणार आहे.

Lift for vehicles near the railway gate | रेल्वे फाटकाजवळ वाहनांसाठी लिफ्ट

रेल्वे फाटकाजवळ वाहनांसाठी लिफ्ट

Next

दिवा येथील ब्रिजसाठी मरेचा अनोखा पर्याय
मुंबई : मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात असणाऱ्या फाटकामुळे लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागत आहे. त्यामुळे फाटक बंद करून रोड ओव्हर ब्रिज बांधला जाणार आहे. मात्र हा ब्रिज बांधल्यास त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांना उतरण्यास जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे यावर पर्याय म्हणून वाहनांची ब्रिजवर चढउतर करण्यासाठी दोन्ही बाजूंना प्रत्येकी २0 टनाच्या चार लिफ्ट उभारण्यात येणार आहेत.
ब्रिज बांधताना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. ब्रिज बांधताना त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांना उतरण्यासाठी जागाच उरलेली नाही. अनधिकृत बांधकामांमुळेच ही जागा राहिली नसल्याने उड्डाणपूल पूर्ण होण्यात अडथळे येत आहेत. यावर मध्य रेल्वेकडून तोडगा काढण्यात आला आहे. मध्य रेल्वेने पालिकेसमोर पुलाच्या दोन्ही बाजूंना लिफ्ट बांधण्याचा पर्याय ठेवला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन-दोन लिफ्ट बांधण्यात येणार असून, त्यांचे प्रत्येकी वजन २0 टन असेल. पुलावर वाहने ये-जा करतील व त्यानंतर दोन्ही बाजूंच्या लिफ्टमधून अवजड वाहनांपासून हलक्या प्रकारची वाहने वर-खाली घेऊन जाता येणे शक्य होईल, असे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Lift for vehicles near the railway gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.