मुंबई : पुणे, मानखुर्द, नवी मुंबई व मुलुंडमधील येथील डॉक्टरांच्या चमूने अवघ्या चार तासांत दोन हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. यामुळे २४ व ५८ वर्षीय इसमांचा जीव वाचविण्यात यश मिळाले. मुंबई व पुण्यामधील झोनल ट्रान्सप्लांट कोआॅर्डिनेशन सेंटर (झेडटीसीसी) येथील वाहतूक व पोलीस अधिकाºयांनी या जीवनदायी प्रत्यारोपणासाठी मदत केली.पुण्यातील दात्याचे हृदय एका २२ वर्षीय घरकाम करणाºया महिलेचे होते, जी पडल्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली होती आणि तिला ब्रेनडेड घोषित करण्यात आले होते. तिच्या पतीने तिचे हृदय, फुप्फुसे, यकृत व मूत्रपिंड दान करणाºयाला संमती दिली, त्यामुळे पाच व्यक्तींना जीवनदान मिळाले. हृदय महामार्गाद्वारे ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून मुंबईला आणण्यात आले, ज्यात पुणे व मुंबई वाहतूक व पोलीस अधिकाºयांचे सहकार्य लाभले, १ तास ४९ मिनिटांमध्ये १४३ किमी अंतर कापण्यात आले. हे हृदय मुंबइतील घाटकोपर येथील २४ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी डायलेटेड कार्डियोमायोपॅथीपासून पीडित होता आणि मे २०१७ पासून प्रतीक्षायादीत होता.वाशी येथील रुग्णालयात अवयवदानात ४५ वर्षांच्या घरकाम करणाºया महिलेचा पती व मुलांनी तिचे हृदय, यकृत व मूत्रपिंड दान केले. १६ आॅगस्ट रोजी ब्रेनडेड घोषित करण्यात आलेल्या रुग्णाला रेल्वे अपघातामुळे दुखापत झाली होती. जानेवारी २०१७पासून मुंबईमधील हे ३४वे कॅडेव्हर डोनेशन होते. हे हृदय ठाण्यातील ५८ वर्षांच्या पुरुषामध्ये प्रत्यारोपित करण्यात आले, जो मागील आठवड्यामध्ये ‘सुपर अर्जंट लिस्ट’ मध्ये प्रतीक्षायादीत होता. व्यवसायाने शिपाई असलेला प्राप्तकर्ता डायलेटेड कार्डियोमोपॅथीपासून पीडित होता.>वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते आणि नर्सिंग युनिट यांनी केलेल्या एकसंघ कार्यामुळे दोन्ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. सध्या कॅडेव्हर डोनेशनच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. कुटुंबीयांनी जर अवयवदानासाठी परवानगी दिली नसती, तर या शस्त्रक्रिया शक्य नव्हत्या. शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून, दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे.- डॉ. अन्वय मुळे, कार्डिअॅक ट्रान्सप्लांट टीम प्रमुख>कुटुंबीयांच्या संमती अशा परिस्थितीत खूप महत्त्वाची असते. त्यामुळे अवयवदानाच्या जनजागृतीमुळे आणखी जीव आपल्याला वाचविता येतील. ब्रेनडेड रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयवदानाबाबत जास्तीत जास्त पुढाकार घ्यायला हवा.- डॉ. एस नारायणी
चार तासांत दोघांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 2:22 AM