मध्य रेल्वेवर लिफ्ट, सरकत्या जिन्यांचा वर्षाव
By admin | Published: June 2, 2016 01:52 AM2016-06-02T01:52:08+5:302016-06-02T01:52:08+5:30
प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांवर सरकते जिने आणि लिफ्ट रेल्वे प्रशासनाकडून बसविण्यात येत आहे. येत्या वर्षभरात मध्य रेल्वेवर सरकते जिने आणि लिफ्टचा वर्षाव होणार असून
मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांवर सरकते जिने आणि लिफ्ट रेल्वे प्रशासनाकडून बसविण्यात येत आहे. येत्या वर्षभरात मध्य रेल्वेवर सरकते जिने आणि लिफ्टचा वर्षाव होणार असून ३४ लिफ्ट तर ३६ सरकते जिने बसविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
गरोदर स्त्रिया, वृद्ध प्रवाशांना स्थानकातील पादचारी पुलांचे जिने चढताना बराच त्रास सहन करावा लागतो. त्यांना आणि अन्य प्रवाशांना होणारा त्रास पाहता मध्य व पश्चिम रेल्वे तसेच एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) सरकते जिने आणि लिफ्ट बसविण्यात येत आहेत. सध्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ११ सरकते जिने बसविण्यात आले असून ठाणे स्थानकात दोन, कल्याणमध्ये दोन, दादरमध्ये दोन, डोंबिवलीत दोन, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि मुलुंडमध्ये प्रत्येकी एक सरकता जिना बसविण्यात आला आहे. तर आणखी २0 सरकते जिने मध्य रेल्वे तर १६ सरकते जिने एमआरव्हीसीकडून बसविण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे मध्य रेल्वेच्या फक्त सीएसटी स्थानकातच तीन लिफ्ट बसविण्यात आल्या असून १६ लिफ्ट मध्य रेल्वेकडून तर १८ लिफ्ट एमआरव्हीसीकडून बसविण्यात येतील. (प्रतिनिधी)
मध्य रेल्वेकडून २0 सरकते जिने
भांडुप, विद्याविहार, बदलापूर आणि उल्हासनगरमध्ये प्रत्येकी एक सरकता जिना बसविण्याचे काम सुरू आहे. हे काम तीन महिन्यांत पूर्ण होईल. तर दादर, एलटीटी आणि ठाणे स्थानकात प्रत्येकी चार, एलटीटी आणि घाटकोपर स्थानकात प्रत्येकी दोन सरकते जिने बसविण्यात येतील. या कामाला मंजुरी मिळाली आहे.
मध्य रेल्वेकडून १६ लिफ्ट
बसविल्या जातील.
सीएसटी, डोंबिवली आणि घाटकोपरमध्ये प्रत्येकी दोन, दादर स्थानकात सहा, ठाणे स्थानकात तीन आणि एलटीटीत एक. एमआरव्हीसीकडून
१८ लिफ्ट
कल्याण स्थानकात चार, वडाळ्यात तीन, चेंबूरमध्ये तीन, मानखुर्दमध्ये तीन, किंग्जसर्कलमध्ये दोन, रे रोडमध्ये दोन, डॉकयार्ड रोडमध्ये एक लिफ्ट बसविण्यात येईल.