मुंबईच्या रस्त्यांवर हायमास्ट दिव्यांचा प्रकाश

By admin | Published: September 27, 2016 04:05 AM2016-09-27T04:05:31+5:302016-09-27T04:05:31+5:30

भारतीय मानकांनुसार कमी प्रकाश असलेले रस्ते व चौक लवकरच उजळणार आहेत. हायमास्ट दिव्यांबाबत नवीन धोरण अखेर आखण्यात आल्याने या दिव्यांची दुरुस्ती आणि देखभाल

The light of the highway light on the streets of Mumbai | मुंबईच्या रस्त्यांवर हायमास्ट दिव्यांचा प्रकाश

मुंबईच्या रस्त्यांवर हायमास्ट दिव्यांचा प्रकाश

Next

मुंबई : भारतीय मानकांनुसार कमी प्रकाश असलेले रस्ते व चौक लवकरच उजळणार आहेत. हायमास्ट दिव्यांबाबत नवीन धोरण अखेर आखण्यात आल्याने या दिव्यांची दुरुस्ती आणि देखभाल शक्य होणार आहे. मात्र सौंदर्यीकरण अथवा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे दिवे बसविण्यासाठी संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना पालिका आयुक्तांकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे.
मुंबईत आजमितीस २१६ ठिकाणी हायमास्ट दिवे आहेत. मात्र या दिव्यांची देखभाल कोणी करावी व दुरुस्तीबाबत कोणतेच धोरण नसल्याने दिवे बदलण्यात येत नव्हते. अखेर हे धोरण पालिका प्रशासनाने आणले आहे.
पालिका आयुक्त अजय मेहता यांनी बोलाविलेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पालिका अधिकाऱ्यांबरोबर बेस्ट, रिलायन्स व महावितरण कंपनीचे अधिकारीही उपस्थित होते. (प्रतिनिधी)

उद्यानांमध्ये शांत प्रकाशाला प्राधान्य
उद्यानांमध्ये मात्र लोक विरंगुळ्यासाठी येत असतात. अशा ठिकाणी प्रखर प्रकाशाची आवश्यक नाही. त्यामुळे त्या ठिकाणी शांत प्रकाश देणारे दिवे प्राधान्याने बसविण्यात येणार आहे.
सुरक्षेच्या हायमास्टसाठी प्रस्ताव
अपवादात्मक परिस्थितीत सौंदर्यीकरण अथवा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हायमास्ट दिवे बसवायचे असल्यास तसा प्रस्ताव सहायक आयुक्तांना आयुक्तांकडे सादर करावा लागेल.

धोरणात काय
सूर्यास्तानंतर सामान्य दिव्यांच्या प्रकाशाचे प्रमाण कमी असलेल्या वॉर्डांमध्ये तपासणी करुन त्या जागेचा आकार लक्षात घेऊन हायमास्ट दिवे बसविण्यात येणार आहेत.
या दिव्यांची देखभाल भाडेपद्धती अंतर्गत विभागातील वितरण कंपनीमार्फत केली जाणार आहे. महापालिकेला देण्यात येणाऱ्या मासिक देयकांमध्ये याची रक्कम वळती करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर याचा एकदम भार पडणार नाही.
रस्त्यावर, चौकात हायमास्ट दिवे लावण्याची विनंती आल्यानंतर त्या ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेल्या दिव्यांचा प्रकाश किती आहे. याचा अभ्यास वॉर्ड व वितरण कंपनीमार्फत केला जाणार आहे. यासाठी
लक्स मीटर वापरुन लक्स लेव्हल तपासणी जाणार आहे.
भारतीय मानक ब्युरो अनुसार ही लक्स लेव्हल कमी असल्यास त्या ठिकाणी हायमास्ट दिवे लावण्याची परवानगी लागेल. दिवे बसवण्यास जागेचा आकार १२५६.८ चौमी साधारण ४० मी व्यास असणे आवश्यक आहे.

Web Title: The light of the highway light on the streets of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.