Join us

मरिन ड्राइव्ह परिसरात होतेय ‘प्रकाश प्रदूषण’; समुद्रकिना-यालगतच्या खांबांवरील प्रखर दिवे धोकादाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 3:16 AM

मरिन ड्राइव्ह समुद्रकिना-यालगतच्या खांबांवरील प्रखर प्रकाशाच्या दिव्यांमुळे वाहनचालकांच्या डोळ्यांवर परिणाम होत आहे. तसेच स्थानिकांनाही उच्च प्रकाशकिरणांचा त्रास होतोय. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे सर्वेक्षणातून आढळल्याचे आवाज फाउंडेशनच्या सुमेरा अब्दुलाली यांनी सांगितले.

मुंबई : मरिन ड्राइव्ह समुद्रकिनाºयालगतच्या खांबांवरील प्रखर प्रकाशाच्या दिव्यांमुळे वाहनचालकांच्या डोळ्यांवर परिणाम होत आहे. तसेच स्थानिकांनाही उच्च प्रकाशकिरणांचा त्रास होतोय. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे सर्वेक्षणातून आढळल्याचे आवाज फाउंडेशनच्या सुमेरा अब्दुलाली यांनी सांगितले.पोलीस जिमखाना, विल्सन जिमखाना येथील उच्च तीव्रतेच्या एलईडी दिव्यांमुळे ‘प्रकाश प्रदूषण’ होत आहे. खांबांवरील दिवे आणि समुद्रकिनाºयालगत असलेल्या प्रखर प्रकाशाच्या दिव्यांमुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती सुमेरा अब्दुलाली यांनी दिली. लाइटच्या प्रखरतेची पातळी मोजण्यासाठी आणि रेकॉर्ड करण्यासाठी ‘आवाज फाउंडेशनने’ लक्स मीटरचा वापर केला. यात विल्सन जिमखाना येथील दिव्यांच्या प्रकाशाच्या तीव्रतेची पातळी ८४ हजार ८०० लक्स इतकी होती. तसेच पोलीस जिमखाना येथे लक्सच्या पातळीची नोंद १५ हजार १०० लक्स मोजण्यात आली. मरिन ड्राइव्ह परिसरातील खांबांवरील प्रकाशाची पातळी २१ हजार लक्स इतकी होती. ही पातळी खूप प्रखर आहे, अशी माहिती आवाज फाउंडेशनचे नीलेश देसाई यांनी दिली.- प्रकाश प्रदूषणामुळे संप्रेरक बदल, झोप न लागणे, अस्वस्थता, चिडचिड होणे इत्यादी आजारांना सामोरे जावे लागते, असा अहवाल आवाज फाउंडेशनमार्फत तयार करण्यात आला आहे.- नीलेश देसार्इंच्या तक्रारीवर कार्यवाही करताना जिल्हाधिकाºयांनी रात्री १० वाजल्यानंतर जिमखान्यांच्या लाइट बंद करण्याची नोटीस पाठवली आहे. तसेच नागरी प्रकाशाबाबत धोरणात्मक अधिसूचना काढण्यासाठी सरकारशी पत्रव्यवहार केला आहे.- महापालिकेकडून नुकतेच जुहू किनाºयावर सुशोभीकरण, तसेच सुरक्षेसाठी रंगीत एलईडी दिवे बसविण्यात आले. मात्र, येथील खांबांवरील दिव्यांमुळे, तसेच संपूर्ण किनाºयालगतच्या दिव्यांमुळे प्रकाशाची तीव्रता वाढली आहे. तशाच प्रकारची बाब मरिन ड्राइव्ह आणि मुंबईतील विल्सन जिमखाना आणि पोलीस जिमखाना येथे दिसून आली आहे.

टॅग्स :मुंबई