Join us  

मानखुर्दमध्ये विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:20 AM

गेल्या पाच दिवसांपासनू मानखुर्द मधील जयहिंद नगर, सोनापूर परिसरात विजेचा लपंडाव सुरु आहे. परिसरातील रहिवाशांनी सांगितले की, घरचा वीजप्रवाह खंडित होतो.

मुंबई : गेल्या पाच दिवसांपासनू मानखुर्द मधील जयहिंद नगर, सोनापूर परिसरात विजेचा लपंडाव सुरु आहे. परिसरातील रहिवाशांनी सांगितले की, घरचा वीजप्रवाह खंडित होतो. रहिवासी रिलायन्स एनर्जी आणि टाटा पॉवरच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क करून तक्रार करतात. तक्रारीनंतर सहा ते सात तासांनी तंत्रज्ञ येऊन दुरुस्तीची कामे करून वीजप्रवाह सुरळीत होतो. वीजप्रवाह सुरळीत झाल्यानंतर अवघ्या एक दोन तासांत पुन्हा वीजप्रवाह खंडित होतो. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरु असलेल्या या प्रकारामुळे परिसरातील २०० ते २५० कुटुंबांना मन:स्ताप होत आहे.रिलायन्स कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे हजाराहून अधिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणाबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी मागील तीन दिवसांपासून ‘लोकमत’ने वारंवार रिलायन्सच्या अधिºयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला;परंतु कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.विभागात रिलायन्ससोबत टाटा पॉवरचेही चेंजओव्हर ग्राहक असल्याने टाटा पॉवरशी संपर्क केल्यानंतर टाटा पॉवरच्या प्रवक्त्याने सांगितले की, विभागातरिलायन्स कंपनी वीजपुरवठा करते. रिलायन्सच्या वीजेच्या केबलमध्ये मोठा फॉल्ट असल्याने वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. याचा विभागातील रिलायन्सच्या ग्राहकांसोबत टाटा पॉवरच्या ग्राहकांनाही नाहक भुर्दंड बसत आहे.