मुलुंडच्या म्हाडा कॉलनीतील मैदानात लावले कॅमेऱ्यांसह दिवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:08 AM2021-06-09T04:08:13+5:302021-06-09T04:08:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुलुंड पूर्वच्या म्हाडा कॉलनी येथे बँकेजवळील मैदानात अखेर एलईडी दिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुलुंड पूर्वच्या म्हाडा कॉलनी येथे बँकेजवळील मैदानात अखेर एलईडी दिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. येथे दिवे नसल्याने हे मैदान तळीराम व गर्दुल्ल्यांचा अड्डा झाला होता.
मैदानाची मालकी म्हाडाकडे असल्याने तेथे पालिकेकडून दिवे लावणे शक्य नव्हते. आजूबाजूच्या परिसरातील नागरिक यामुळे अनेक वर्षे त्रस्त होते. गेली २ वर्षे सातत्याने मुलुंड म्हाडा कॉलनी असोसिएशनचे अध्यक्ष रवी नाईक व सचिव पुष्कराज माळकर यांनी पाठपुरावा केला व अखेर मैदानात १२ पोल १५ एलइडी दिवे म्हाडाने बसविले. मैदान व मैदानाजवळचा परिसर सतत निरीक्षणाखाली राहावा म्हणून नवरात्र मंडळ व रहिवाशांच्या मदतीने हाय रेंज नाइट व्हिजनचे ६ कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. यामुळे म्हाडा कॉलनीतील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. शनिवारी या मैदानात बसविण्यात आलेले दिवे व कॅमेऱ्याचे उद्घाटन नवघर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कांबळे यांनी केले. या वेळी म्हाडाचे निवृत्त अभियंते विलास पाटील तसेच विनायक सुतार, दिवाकर कोयांदे व रहिवासी उपस्थित होते.
................................