आता रुग्णालये, मेट्रो स्थानके अन् विमानतळाचे लाइटही जाणार नाही; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 06:15 IST2025-04-08T06:13:45+5:302025-04-08T06:15:06+5:30

टाटा पॉवर कंपनी मुंबई वितरणातील लोड सेंटर्सजवळ १०० मेगावॉटची प्रणाली १० मोक्याच्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे.

lights of hospitals metro stations and airports will not go out | आता रुग्णालये, मेट्रो स्थानके अन् विमानतळाचे लाइटही जाणार नाही; कारण...

आता रुग्णालये, मेट्रो स्थानके अन् विमानतळाचे लाइटही जाणार नाही; कारण...

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईलावीजपुरवठा करणाऱ्या पारेषण वाहिन्यांत बिघाड होऊन ब्लॅक आऊट झाल्यानंतर रुग्णालये, मेट्रो आणि विमानतळासह महत्त्वाच्या ठिकाणचा वीजपुरवठा त्वरित सुरू करता यावा म्हणून टाटा पॉवर कंपनी आयलँडिंग आणि लोड मॅनेजमेंट योजनांसह बॅटरी एनर्जी स्टोअरेज सिस्टिम  विकसित करणार आहे. 

१०० मेगावॉटची बॅटरी एनर्जी स्टोअरेज यंत्रणा
सुमारे ८ लाख निवासी आणि व्यावसायिक ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या टाटा पॉवरला १०० मेगावॉट क्षमतेची बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिम उभारण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मान्यता दिली आहे. टाटा पॉवर कंपनी मुंबई वितरणातील लोड सेंटर्सजवळ १०० मेगावॉटची प्रणाली १० मोक्याच्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. तिचे निरीक्षण आणि नियंत्रण टाटा पॉवरच्या ‘पॉवर सिस्टिम कंट्रोल सेंटर’कडून केले जाईल, असादावा टाटा पॉवर कंपनीने केला आहे. 

विजेची साठवणूक 
विजेची मागणी आणि पुरवठ्याचे नियोजन ही प्रणाली करेल. त्यामुळे अधिक मागणीच्या काळातही स्थिर आणि संतुलित वीजपुरवठ्याची हमी मिळेल. शिवाय कमी दराच्या काळात वीज साठवून, उच्च दराच्या काळात तिचा वापर करून वीज खरेदी खर्च कमी करण्यास मदत करेल. त्यातून भांडवली खर्च कमी करण्यास मदत होईल. दिवसा अतिरिक्त वीज साठवता येईल.  अधिकच्या मागणीवेळी ती उपलब्ध करून देतानाच सौरऊर्जेचा वापर वाढवणे शक्य होईल, असा दावा टाटा पॉवरने केला आहे.

Web Title: lights of hospitals metro stations and airports will not go out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.