थकबाकी असणाऱ्या वीज ग्राहकांची बत्ती गूल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:07 AM2021-09-19T04:07:47+5:302021-09-19T04:07:47+5:30

मुंबई : पाचशे रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणाऱ्या २० लाख ७१ हजार घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडून ( २ हजार ...

The lights of the outstanding electricity consumers will go out | थकबाकी असणाऱ्या वीज ग्राहकांची बत्ती गूल होणार

थकबाकी असणाऱ्या वीज ग्राहकांची बत्ती गूल होणार

Next

मुंबई : पाचशे रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणाऱ्या २० लाख ७१ हजार घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडून ( २ हजार ९०९ कोटी रुपये थकबाकी) वसुली करावी अथवा त्यांचा वीजपुरवठा तातडीने खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महावितरणच्या आर्थिक स्थितीवर थकबाकीचा वाढता डोंगर गंभीर परिणाम करणारा ठरत आहे. परिणामी दैनंदिन खर्चासह, कर्मचाऱ्यांचे पगार, वीज खरेदीसारख्या अत्यावश्यक बाबींसाठी कर्ज काढण्याची वेळ महावितरणवर आली आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करून थकबाकी वसुलीच्या कामाला गती देत निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरण वेगाने काम करत आहे.

-----------------------

कोकण प्रादेशिक विभाग ( परिमंडल )

कल्याण

भांडुप

रत्नागिरी

नाशिक

जळगाव

-----------------------

लघुदाब वर्गवारी ( रुपयांचे वीजबिल थकीत )

४३ लाख २४ हजार घरगुती ग्राहकांकडे ७३९ कोटी

५ लाख २३ हजार व्यावसायिक ग्राहकांकडे ३०६ कोटी

१ लाख ४ हजार औद्योगिक ग्राहकांकडे ३७२ कोटी

२३ हजार ६४९ पाणीपुरवठा योजनांकडे ४९८ कोटी

४४ हजार ७५४ पथदिवे जोडण्यांचे १ हजार ६४६ कोटी

-----------------------

वीजबिल थकबाकी

भांडूप परिमंडल : १० लाख ३२ हजार ६१२ ग्राहकांकडे ५३७ कोटी

कल्याण परिमंडल : १३ लाख ३ हजार ७१८ ग्राहकांकडे ५५३ कोटी

कोकण परिमंडल : ४ लाख ६२ हजार ६९५ ग्राहकांकडे १३६ कोटी

नाशिक परिमंडल : १२ लाख २४ हजार ३१९ ग्राहकांकडे ९९५ कोटी

जळगाव परिमंडल : ९ लाख ९६ हजार १७२ ग्राहकांकडे १ हजार ३४१ कोटी

----------------

वीजपुरवठा पूर्ववत नाही : थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर पुन:र्जोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जात नाही.

----------------

कायदेशीर कारवाई

पुरवठा खंडित केलेल्या ठिकाणी परस्पर वीजपुरवठा जोडणे, शेजारी अथवा इतराकडून वीज घेणे अथवा अनधिकृतपणे वीज वापरल्याचे आढळून आल्यास कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल.

----------------

Web Title: The lights of the outstanding electricity consumers will go out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.