Join us

कमळ आणि खटा:याची आव्हानात्मक लढाई

By admin | Published: October 11, 2014 10:55 PM

रामशेठ ठाकूर यांनी हातात घेतलेले कमळ, शेतकरी कामगार पक्षाने गड पुन्हा काबीज करण्यासाठी लावलेली फिल्डिंग या सर्व पाश्र्वभूमीवर पनवेलमध्ये रंगतदार स्थिती निर्माण झाली आहे.

प्रशांत शेडगे ल्ल पनवेल
आघाडीत बिघाडी आणि महायुतीचा तुटलेला संसार त्याचबरोबर रामशेठ ठाकूर यांनी हातात घेतलेले कमळ, शेतकरी कामगार पक्षाने गड पुन्हा काबीज करण्यासाठी लावलेली फिल्डिंग या सर्व पाश्र्वभूमीवर पनवेलमध्ये रंगतदार स्थिती निर्माण झाली आहे. प्रशांत ठाकूर विरुध्द बाळाराम पाटील हा सामना असला तरी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या पक्षाची ताकदही निर्णायक ठरु शकते. परिणामी, ही निवडणूक अतिशय आव्हानात्मक झाली आहे.
पनवेल हा शेतकरी कामगार पक्षाचा गड राहिलेला आहे. या ठिकाणी लालबावटय़ाची पाळेमुळे रुजली असल्याने पक्षाची ताकद अधिक होती. परिणामी, 5क् वर्षे पक्षाची सत्ता या तालुक्यावर राहिली. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी दहा वर्षापूर्वी शेकाप पक्षाला लाल सलाम करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने या भागात हाताचा पंजा बळकट झाला. रायगडमधून दोनदा खासदार म्हणून निवडून गेलेल्या रामशेठ यांची समाजातील इमेज अतिशय चांगली आणि स्वच्छ आहे. मुळातच राजकारण पिंड नसलेल्या ठाकूर यांचे समाजकारण जनतेला अधिक भावते. याच जोरावर 2क्क्6 साली त्यांनी पालिकेवर सत्ता आणली, त्याचबरोबर ग्रामीण भागातील ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. एकेकाळी खांद्याला खांदा लावून प्रतिस्पर्धाना चारी मुंडय़ा चीत करणारे नेते 2क्क्9 साली परस्पर विरोधी निवडणुका लढले. पराभव काय असतो हे कधीच माहीत नसलेल्या रामशेठ ठाकूर यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना निवडून आणीत 52 वर्षाचा इतिहास बदलून टाकला. खारघर टोलनाक्याच्या मुद्यावरुन ठाकूर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्या रुपाने तुल्यबळ नेता प्रशांतसारखा सक्षम उमेदवार मिळाल्याने नितीन गडकरी, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार हे पनवेलमध्ये आले आणि ठाकुरांचा प्रवेश करुन घेतला व त्याचदिवशी निवडणुकीचे रणशिंगही फुंकले. रामशेठ यांची पुण्याई, गेल्या पाच वर्षात पनवेलमध्ये झालेली सहाशे कोटींची विकास कामे, मोदी फिवर, काँग्रेसविरोधी वातावरण, शिवसेनेचा नवखा उमेदवार या सर्व गोष्टी प्रशांत ठाकूर यांच्यासाठी जमेच्या आहेत.
केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, महादेव जानकर यांनी त्यांच्यासाठी सभा घेतल्या. रामदास आठवलेही रविवारी खारघर येथे सभा घेणार असल्याने ब:यापैकी वातावरण निर्मिती झाली आहे. शेतकरी कामगार पक्षाने आपल्या पध्दतीने जोर लावला असून ठाकूर यांच्यावर टीका हा एककलमी प्रचार त्यांनी केला आहे. गेल्या पाच वर्षात बाळाराम पाटील यांनी मतदारसंघाची चांगली बांधणी केली आहे. शहरी भागातही चांगला प्रभाव निर्माण केला असून पनवेलच्या ग्रामीण भागाची खडान्खडा माहिती असलेल्या माजी सभापती काशिनाथ पाटील यांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा सोपवण्यात आली आहे. 
 
च्राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष सुनील घरत हे निवडणूक रिंगणात असून सुनील तटकरे यांनी त्यांच्याकरिता सभा घेतली. प्रचार फे:या, मोटारसायकल रॅली त्याचबरोबर त्यांनी एक गठ्ठा मतदानावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.
 च्सेनेने या ठिकाणी वासुदेव घरत हा नवखा उमेदवार दिला असून अनेक शिवसैनिकांना त्यांचा परिचयही नाही. आदित्य ठाकरे यांनी पनवेलमध्ये एक सभा घेतली खरी, मात्र इतर नेते या मतदारसंघात फिरकले नसल्याचेच दिसून आले आहे.
च्रामशेठ यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसमधील रामच निघून गेला, उरले सुरले नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आर. सी. घरत यांचा प्रचार करीत असले तरी आज मितीला एक सभा झाली नाही.