अवयवदानाचा टक्का कमीच

By admin | Published: March 27, 2015 12:48 AM2015-03-27T00:48:32+5:302015-03-27T00:48:32+5:30

अवयवदानाचा टक्का गेल्या तीन वर्षांत वाढताना दिसत आहे. पण, अद्यापही म्हणावे तितक्या प्रमाणात अवयवदान होताना दिसत नाही.

Limit of limb | अवयवदानाचा टक्का कमीच

अवयवदानाचा टक्का कमीच

Next

मुंबई: अवयवदानाचा टक्का गेल्या तीन वर्षांत वाढताना दिसत आहे. पण, अद्यापही म्हणावे तितक्या प्रमाणात अवयवदान होताना दिसत नाही. जिवंत व्यक्तींपेक्षा ब्रेन डेड घोषित केलेल्या व्यक्तींचे अवयवदानाचे प्रमाण वाढले पाहिजे. प्रत्यक्षात मात्र सव्वादोन वर्षांत ब्रेनडेड घोषित केलेल्यांपैकी फक्त ३० टक्के जणांचे अवयवदान करण्यात आले आहे. हा टक्का अजूनही कमी आहे. अवयवदान केल्याने एखाद्या व्यक्तीला जीवनदान मिळू शकते, ही बाब लोकांच्या मनात रुजण्याची आवश्यकता आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
सव्वादोन वर्षांत राज्यात २३१ व्यक्तींना ब्रेनडेड म्हणून घोषित करण्यात आले होते. पण, यापैकी फक्त ८० व्यक्तींच्या नातेवाईकांनी अवयवदानास परवानगी दिली
आहे.
या ८० व्यक्तींमुळे २७२ व्यक्तींना जीवनदान मिळाले आहे. १२९ किडनी आणि ६१ यकृतदान झाले. अवयवदान हे श्रेष्ठदान आहे, याविषयी जनजागृती व्हायला पाहिजे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा आॅगस्ट २०१२ मध्ये यकृत विकारामुळे मृत्यू झाल्यानंतर अवयवदानाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. यानंतर विविध पद्धतीने अवयवदान जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली.
गेल्या काही वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता समाजात अवयवदानाविषयीचे ज्ञान वाढले आहे. पण, तरीही टक्का वाढलेला नाही. अवयवदान केल्याने पुढच्या जन्मात तो अवयव मिळणार नाही, अवयवदान करणे चांगले नाही, देवाने जसे जन्माला घातले तसेच परत जावे, असे अनेक गैरसमज अवयवदानाविषयी होते.
हे गैरसमज आता काही प्रमाणात कमी झाले आहेत. पण, अजूनही अनेकजण प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचे अवयव कसे देणार? या विचाराने अवयवदानासाठी नकार देतात. हे योग्य नाही. ही मानसिकता बदलायला हवी. यामुळे अनेकजणांना जीवनदान मिळेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. (प्रतिनिधी)

कॅडेव्हर डोनेशन
वर्षकिडनी यकृत फुफ्फुस
२०१२४९२२२
२०१३५९२६०
२०१४८०४६०

Web Title: Limit of limb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.