मुंबई : नगर परिषदांच्या धर्तीवर राज्यातील ११० नगरपंचायतींच्या नगराध्यक्षाची निवडणूक थेट पद्धतीने घेण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम - १९६५ मध्ये सुधारणा करणारा अध्यादेश काढण्यास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.यापूवी नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट पद्धतीने घेण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र, ही तरतूद नगरपंचायतीमध्ये लागू नव्हती. त्यासाठी अधिनियमातील काही कलमांमध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाचा कालावधी सध्याच्या अडीच वर्षांऐवजी पाच वर्षांचा होईल. प्रक्रियेप्रमाणे नामनिर्देशन करण्याचा आणि निर्णायक मत देण्याचाही अधिकार अध्यक्षांना प्राप्त होणार आहे.
नगर परिषदांच्या धर्तीवर राज्यातील ११० नगरपंचायतींमध्ये आता थेट नगराध्यक्ष निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 5:44 AM