आता रेंगाळलेल्या प्रकल्पांना मिळणार गती; खासदारांच्या आंदोलनाला मिळाले यश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 06:56 PM2021-11-03T18:56:24+5:302021-11-03T18:57:13+5:30

झोपड़पट्टी पुनर्वसन प्राधिकरणा बरोबर विशेष बैठक संपन्न 

the lingering projects will gain momentum The MP movement was a success | आता रेंगाळलेल्या प्रकल्पांना मिळणार गती; खासदारांच्या आंदोलनाला मिळाले यश

आता रेंगाळलेल्या प्रकल्पांना मिळणार गती; खासदारांच्या आंदोलनाला मिळाले यश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क, मनोहर कुंभेजकर

मुंबई-चक्क दिवाळीत आज दुपारी उत्तर मुंबईतून खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली वांद्रे पूर्व एसआरए कार्यालयावर भाजपाच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात येणार  होता.मात्र एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी एमआरए प्रकल्पांना गती देण्यासाठी शासन करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांना आज सकाळी बैठकीचे रितसर आमंत्रित करून आणि आजचा मोर्चा रद्द करायची विनंती केली होती.

सतीश लोखंडे यांच्या बरोबर खासदारांची सकारात्मक बैठक झाली. त्यामुळे आता रेंगाळलेल्या प्रकल्पांना गती मिळण्याची दिवाळी भेट झोपडपट्टीवासीयांना मिळाली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी लोकमतकडे व्यक्त केली.लोकमत ऑनलाईन आणि लोकमत मधून सातत्याने या महत्वाच्या प्रश्नांवर आवाज उठवून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. याबद्धल त्यांनी लोकमतला धन्यवाद दिले.

आज सकाळी खासदार शेट्टी सोबत उत्तर मुंबईतून मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहून बांद्रा पूर्व येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात सतीश लोखंडे आणि अन्य अधिकऱ्यां बरोबर  विस्तृत बैठक झाली. मालाड येथील तक्षशिला एसआरए इमारतीतील ४०  रहिवाशांना लवकरात लवकर घर देण्यात येणार आणि इतर सर्व एसआरए संबधित प्रलंबित विषय  सब कमिटी पर्यंत रिपोर्ट तयार करून पाठविण्यात यावे असे  एस आर ए अधिकाऱ्यांना सतीश लोखंडे यांनी निर्देश दिले आहे. बंद पडलेले रेंगाळलेल्या प्रकल्पाला बँकेचे पैसे असशील तर बँकच रहिवाश्यांना भाडे देतील आणि बँकने पैसे लावून प्रकल्प पूर्ण करावे, त्याच प्रमाणे पात्र अपात्र ठरविण्यात खूप काही अटी आता सोप्या व सरळ केल्या असून आजची सव्वा तासांची चाललेली बैठक अतिशय सकारात्मक झाली असल्याचे खा.शेट्टी यांनी लोकमतला सांगितले.

आपली सातत्याने आंदोलन, बैठका,  पाठपुराव्यामुळेच योग्य निर्णय श्री सतीश लोखंडे यांनी दिले आहे असे समाधान व्यक्त केले.याप्रसंगी खा.गोपाळ शेट्टी यांच्या सोबत मुंबई भाजप सचिव डॉ योगेश दुबे व विनोद शेलार, युनूस खान, योगेश वर्मा, पालिकेचे भाजप उपनेते कमलेश यादव, भाजप सर चिटणीस उत्तर मुंबई बाबा सिंह, सचिव ऍड.सिद्धार्थ शर्मा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी गणेशोत्सवा पासून  जणू एक मोहिमच सुरू केली होती. यामुद्यावर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर पाठपुरावा केला.उत्तर मुंबईच्या सहा विधानसभा क्षेत्रात आंदोलने केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खासदार शेट्टी आणि संबधित प्रशासकीय अधिकऱ्यांबरोबर
अलिकडेच राजभवन येथे संयुक्त बैठक घेऊन रेंगाळलेल्या एसआरएबाबत नाराजी व्यक्त करून या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले होते अशी माहिती त्यांनी दिली.
 

Web Title: the lingering projects will gain momentum The MP movement was a success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.