अंतिम वर्ष परीक्षेसाठीची लिंक मिळणार येत्या दोन दिवसांत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 02:31 AM2020-09-29T02:31:15+5:302020-09-29T02:31:41+5:30

मुंबई विद्यापीठ; अंतिम वर्षाची परीक्षा १ आॅक्टोबरपासून

The link for the final year exam will be available in the next couple of days | अंतिम वर्ष परीक्षेसाठीची लिंक मिळणार येत्या दोन दिवसांत

अंतिम वर्ष परीक्षेसाठीची लिंक मिळणार येत्या दोन दिवसांत

Next

मुंबई : अंतिम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा १ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहेत, त्यांना परीक्षेसंबंधी लिंक ही परीक्षेच्या २ दिवस आधी, ३० सप्टेंबरपूर्वी पाठविण्यात येईल, असे मुंबई विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले. अंतिम वर्षाच्या बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सध्या सुरू असून, १ तारखेपासून नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होतील. अंतिम वर्षाच्या आॅनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणक यापैकी कोणती साधने आहेत? विद्यार्थी सध्या वास्तव्यास कुठे आहेत? इंटरनेट कनेक्शनची काय परिस्थिती आहे? या सगळ्याची माहिती विद्यापीठाने प्रत्येक महाविद्यालयाला विद्यार्थ्यांकडून गोळा करण्यास संगितली होती. विद्यापीठ विभागांकडूनही ती गोळा करण्यात आली आहे.

दरम्यान, विद्यापीठ विभागाने आॅनलाइन परीक्षेसाठी अ‍ॅप विकसित केले आहे. यावरून विद्यार्थ्यांना आॅनलाइन परीक्षा देणे शक्य होईल. त्या संदर्भातील लिंक त्यांना येत्या २ दिवसांत मिळणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.

शुल्क भरण्यासाठी ४ हप्त्यांची सवलत
कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे एआयसीटीई आणि यूजीसी यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, विविध विभाग त्यांचे प्राचार्य यांना विद्यार्थ्यांना शुल्कात दिलासा देण्याचे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत. महाविद्यालयांनी शुल्क वाढ करू नये, तसेच आवश्यकता असल्यास विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून शुल्काचे विभाजन ४ हप्त्यांत करून त्यांना दिलासा द्यावा, असे निर्देश प्रभारी कुलसचिव विनोद पाटील यांनी दिले.

Web Title: The link for the final year exam will be available in the next couple of days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.