लिंक रोडचे काम धिम्या गतीने, कोंडीत भर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 01:43 PM2023-10-09T13:43:25+5:302023-10-09T13:44:18+5:30
हे काम येत्या चार वर्षांत पूर्ण होईल पालिकेचे उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी सांगितले. त्यामुळे किमान चार वर्षं तरी नागरिकांना वाहतूककोंडीला जावे लागणार आहे.
मुंबई : गोरेगाव आणि मुलुंड या दोन महत्त्वाच्या उपनगरांना जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला. या प्रकल्पांतर्गत गोरेगाव परिसरातील उड्डाणपुलाचे भूमिपूजन १४ एप्रिल २०२२ रोजी हस्ते झाले होते. मात्र गोरेगाव आणि मुलुंड लिंक रोडच्या धिम्या कामाने सुरू असल्याने या मार्गावर वाहतूककोंडी होत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. हे काम येत्या चार वर्षांत पूर्ण होईल पालिकेचे उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी सांगितले. त्यामुळे किमान चार वर्षं तरी नागरिकांना वाहतूककोंडीला जावे लागणार आहे.
१२.२ - किलोमीटर यात जोडरस्त्याची लांबी आहे.
२.८ - किलोमीटर ‘फिल्म सिटी’ पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकर
१.२९ - किलोमीटर लांबीचा व ३×३ मार्गिकेचा उड्डाणपुलाचे काम
हे काम लवकर पूर्ण व्हावे, असे नागरिक दीपक मनवे यांनी सांगितले.
वाहतूककोंडी होते. त्यामुळे हे कामपूर्ण करण्यासाठी प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. तरच सुटका करावी, असे एकदंत सोसायटीचे अध्यक्ष मारुती उगले म्हणाले.