वाहन परवाना ‘आधार’शी लिंक झाल्यास आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:07 AM2021-02-15T04:07:14+5:302021-02-15T04:07:14+5:30

मुंबई : वाहन आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र आधारकार्डला लिंक केल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) गर्दी बरीच कमी होईल आणि ...

Linking the vehicle license to Aadhaar will reduce the congestion in the RTO office | वाहन परवाना ‘आधार’शी लिंक झाल्यास आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी होईल

वाहन परवाना ‘आधार’शी लिंक झाल्यास आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी होईल

googlenewsNext

मुंबई : वाहन आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र आधारकार्डला लिंक केल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) गर्दी बरीच कमी होईल आणि वाहनचालकांची एजंटपासून सुटका होईल, असे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले.

परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे म्हणाले की, केंद्र सरकारने वाहन परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र ‘आधार’शी लिंक करण्यासंदर्भात एक प्रारूप अधिसूचना जारी केली आहे. वाहन आणि सारथी प्रणाली आधारशी जोडली गेली की, आरटीओ कार्यालयातील गर्दी २० टक्क्यांपर्यंत कमी होईल. या बदलानंतर ड्रायव्हिंग लायसन्स आणि व्हेईकल फिटनेसशी संबंधित कामांसाठी मोजक्याच लोकांना आरटीओ कार्यालयात भेट द्यावी लागेल, असे परिवहन आयुक्तांनी सांगितले. आधार लिंकमुळे आरटीओंना भेट देऊन कागदपत्रे सादर करण्याची गरज नाहीशी होईल, असेही ते म्हणाले.

सध्या राज्यभरातील ५० प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये दररोज सुमारे १.५० लाख लोक येतात. आधारकार्ड ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीशी लिंक झाल्यानंतर ही संख्या ४० हजार किंवा त्याहूनही कमी होईल.

अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त

Web Title: Linking the vehicle license to Aadhaar will reduce the congestion in the RTO office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.