आज आणि उद्या पहाटे ५ पर्यंत मद्य विक्रीची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 08:08 AM2022-12-24T08:08:38+5:302022-12-24T08:09:38+5:30

नाताळ व नववर्षाच्या निमित्ताने ही विशेष सूट देण्यात आली आहे.

Liquor sale till 5 am today and tomorrow new year and christmas 31st december maharashtra | आज आणि उद्या पहाटे ५ पर्यंत मद्य विक्रीची परवानगी

आज आणि उद्या पहाटे ५ पर्यंत मद्य विक्रीची परवानगी

Next

मुंबई : नाताळ व नववर्षाच्या निमित्ताने २४ डिसेंबर, २५ डिसेंबर व ३१ डिसेंबर या दिवशी हॉटेल्स व क्लबमधून पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर, मद्य विक्री करणाऱ्या दुकानांना रात्री १ पर्यंत दुकाने सुरू ठेवून मद्य विक्री करता येणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने या संदर्भात शुक्रवारी आदेश जारी केले आहेत. मुंबईत हॉटेल्स व क्लबमधून रात्री १२ वाजेपर्यंत मद्यविक्रीस एरवी परवानगी असते तर मद्याच्या दुकानांतून रात्री साडे दहापर्यंत मद्यविक्रीस मुभा आहे. मात्र, नाताळ व नववर्षाच्या निमित्ताने ही विशेष सूट देण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी नाताळ व नववर्ष संध्या हे दोन्ही दिवस अनुक्रमे रविवार व शनिवार असे आले आहेत. तसेच नाताळच्या आदल्या रात्री शनिवार आहे. या तीनही दिवशी दुकाने, हॉटेल्स व क्लब उशिरापर्यंत सुरू राहतील.

Web Title: Liquor sale till 5 am today and tomorrow new year and christmas 31st december maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.