- जमीर काझीमुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांचा उत्तराधिकारी नेमण्याच्या कामाला राज्य सरकारने सुरुवात केली आहे. त्यासाठी गृह विभागाकडून केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (युपीएससी) सहा महासंचालकांची नावे व त्यांच्या कारर्किदीच्या माहितीचा प्रस्ताव नुकताच पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून आलेल्या अंतिम तीन नावातून एकाची निवड राज्य सरकारकडून केली जाईल.फेबु्रवारी अखेरीस पडसलगीकर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची धुरा मुंबईचे आयुक्त सुबोध जयस्वाल यांच्याकडे सोपविली जाईल, हे जवळपास निश्चित आहे. मात्र नियुक्तींची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अन्य अधिकाऱ्यांचीही नावे पाठविण्यात आली असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. जयस्वाल यांच्यानंतर जेष्ठ असलेले ‘होमगार्ड’चे महासमादेशक संजय पांडे, ‘एसीबी’चे प्रमुख संजय बर्वे, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळांचे कार्यकारी संचालक बिपीन बिहारी,‘कारागृह सुधारणा’चे सुरेंद्र पांडे, सुरक्षा महामंडळांचे कार्यकारी संचालक डी. कनकरत्नम यांच्या नावांचा समावेश असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.दोन टप्यात सहा महिन्यांची मुदतवाढ मिळालेल्या पडसलगीकर यांना जून २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठविला होता. केंद्रीय गृह विभागाने हा प्रस्ताव फेटाळला असल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात येते.सर्वोच्च न्यायालयाने पोलीस महासंचालकांची नियुक्ती करण्यापूर्वी त्यासाठी पात्र असलेल्या सेवा जेष्ठ अधिकाºयांची यादी ‘युपीएससी’कडे पाठवून देणे बंधनकारक केले आहे. निवड समितीकडून त्याची छाननी करुन अंतिम तीन नावे निश्चित करुन राज्य सरकारकडे पाठविले जाईल. त्यानंतर राज्याने त्यापैकी एका अधिकाºयांची नियुक्ती पोलीस महासंचालक म्हणून करायाची आहे.१९८५ च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी सुबोध जायस्वाल हे सर्वातजेष्ठ अधिकारी असून ते सप्टेंबर२०२२ ला निवृत्त होणार आहे. त्यामुळे त्यांना ३ वर्षे सात महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.दरम्यान मुंबईचे आयुक्त सुबोध जायस्वाल यांची सुत्रे कोणाकडे दिली जाणार, याबाबतच सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्यासाठी अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमवीर सिंह व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांच्या नावांचीचर्चा आहे.
पोलीस महासंचालकपदाच्या नियुक्तीसाठीची यादी पोहोचली केंद्राकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 2:38 AM