अकरावी प्रवेशाची यादी जाहीर, पहिल्या यादीत सव्वा लाख विद्यार्थ्यांना प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:48 AM2018-07-06T00:48:37+5:302018-07-06T00:48:46+5:30
अकरावी प्रवेशासाठी राज्यातील विद्यार्थांनी भरलेल्या अर्जांची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली. या यादीनुसार अर्ज भरलेल्या २ लाख विद्यार्थ्यांपैकी एकूण १ लाख २० हजार विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश मिळाला आहे.
मुंबई : अकरावी प्रवेशासाठी राज्यातील विद्यार्थांनी भरलेल्या अर्जांची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली. या यादीनुसार अर्ज भरलेल्या २ लाख विद्यार्थ्यांपैकी एकूण १ लाख २० हजार विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश मिळाला आहे. सायन्स आणि कॉमर्स शाखेतील मुंबईतील नामांकित महाविद्यालयांच्या प्रवेशांच्या कट आॅफमध्ये ४ ते ५ टक्क्यांनी वाढ झाली असून यादी ९० टक्क्यांच्या पलीकडेच असल्याचे दिसून आले.
गुरुवारी सकाळी ११ वाजता यादी जाहीर झाली. मुंबईतून २ लाख ३ हजार १२० विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी अर्ज केला होता. यामध्ये सर्वाधिक अर्ज हे वाणिज्य शाखेसाठी आले होते. यातील १ लाख २० हजार ५६८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून यापैकी ३५ हजार ७८७ विद्यार्थांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. तर १८ हजार ८३१ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. दरम्यान, लवकरच अकरावी प्रवेशाची दुसरी यादीदेखील जाहीर करण्यात येणार असून उरलेल्या ८० हजार विद्यार्थांच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे त्यांनी ६ ते ९ जुलैदरम्यान संबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. ज्यांना दुसºया गुणवत्ता यादीसाठी वाट पाहावयाची असेल, ज्यांना कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंतीक्रम बदलायचे असतील त्यांनी १० व ११ जुलै या कालावधीत आपले पसंतीक्रम बदलून त्याची प्रिंट काढून ठेवावी तर ज्यांना पसंतीक्रम बदलायचे नाहीत त्यांचे पूर्वीचेच पसंतीक्रम ग्राह्य धरून पुढच्या फेरीत त्यांना प्रवेश देण्यात येईल.
कट आॅफ लिस्ट
मिठीबाई कॉलेज -
आर्ट्स - ८७.२ %
कॉमर्स - ९०.३३ %
सायन्स - ८८.४ %
जयहिंद कॉलेज
आर्ट्स - ८९.८ %
कॉमर्स - ९०.६६ %
सायन्स - ८५.८३ %
रुईया कॉलेज
आर्ट्स (इंग्रजी)- ९२.२ %
आर्ट्स (मराठी)- ६८.४%
सायन्स - ९३.२ %
के.सी. कॉलेज
आर्ट्स - ८६ %
कॉमर्स- ९०.२० %
सायन्स - ८७%
झेव्हिअर्स कॉलेज
आर्ट्स - ९४.२ %
सायन्स - ९०.४%
एच.आर. कॉलेज
कॉमर्स - ९२.%
आर.ए. पोदार कॉलेज
कॉमर्स - ९३%
रूपारेल कॉलेज
आर्ट्स - ८६ %
कॉमर्स - ८९.६ %
सायन्स - ९१.८ %
नरसी मोनजी कॉलेज
कॉमर्स - ९४.२ %
वझे केळकर कॉलेज
आर्ट्स - ८६.८ %
कॉमर्स- ९०.८ %
सायन्स - ९३ %
हिंदुजा कॉलेज
आर्ट्स - ७४.२ %
कॉमर्स - ८९.२ %
सायन्स - ८७ %
पाटकर कॉलेज
कॉमर्स - ८५%
बी.एन. बांदोडकर
कॉलेज
सायन्स - ९१.८ %
साठ्ये कॉलेज -
आर्ट्स - ८०. ८ %
कॉमर्स - ८९. ४ %
सायन्स - ९२. ६ %
मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या पहिल्या यादीतील कट आॅफमध्ये ३ ते ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्य बोर्डासहित आयसीएसई आणि सीबीएसईचे नव्वदीपार विद्यार्थीही वाढले आहेत. त्यामुळे पहिल्या यादीचा कटआॅफच नव्वदीपर गेला आहे. दुसºया यादीतही अशीच चुरस पाहायला मिळू शकते. - राजपाल हांडे, प्राचार्य, मिठीबाई कॉलेज