अकरावीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज; मुंबई विभागातून १ लाख ८५ हजार ४७७ अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 04:23 AM2019-07-05T04:23:44+5:302019-07-05T04:24:09+5:30

नव्याने लागू झालेल्या मराठा आरक्षण आणि आर्थिक दुर्बल आरक्षणाचा लाभ अकरावी प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी वाढविण्यात आलेला भाग १ आणि २ नोंदणीचा कालावधी ४ जुलै रोजी संपला आहे.

List of eleventh general quality today; 1 lakh 85 thousand 477 applications from Mumbai division | अकरावीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज; मुंबई विभागातून १ लाख ८५ हजार ४७७ अर्ज दाखल

अकरावीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज; मुंबई विभागातून १ लाख ८५ हजार ४७७ अर्ज दाखल

Next

मुंबई : अकरावी प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर होणार असून विद्यार्थी आणि पालक ६ व ८ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील त्रुटी आणि हरकती संबंधित उपसंचालक कार्यालयात नोंदवू शकणार आहेत.
नव्याने लागू झालेल्या मराठा आरक्षण आणि आर्थिक दुर्बल आरक्षणाचा लाभ अकरावी प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी वाढविण्यात आलेला भाग १ आणि २ नोंदणीचा कालावधी ४ जुलै रोजी संपला आहे. त्यामुळे सर्वसाधारण यादीसाठी नोंदणीच्या शेवटी मुंबई विभागातून एकूण १ लाख ८५ हजार ४७७ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ९२ हजार २२० मुलींचा तर ९३ हजार २५७ मुलांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी शुक्रवारी जाहीर होणाºया सर्वसाधारण यादीसाठी पात्र ठरले आहेत.
यंदा मुंबई विभागातून अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी असणारी प्रवेश क्षमता एकूण ३ लाख १९ हजार १८६ इतकी आहे. यामधील कला शाखेसाठी ३७ हजार ०७१ जागा, वाणिज्यसाठी १ लाख ७४ हजार ०४६ तर विज्ञान शाखेसाठी १ लाख ०२ हजार ४०९ आणि एचएसव्हीसीसाठी ५ हजार ६६० जागा उपलब्ध आहेत.
विशेष म्हणजे अर्ज निश्चिती झालेल्या १ लाख ८५ हजार ४७७ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ६८ हजार ९९५ विद्यार्थी हे राज्य मंडळाचे आहेत तर सीबीएसई मंडळाचे ५ हजार ९६९ विद्यार्थी आहेत. त्यामुळे आता सर्वसाधारण गुणवत्ता यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

१२ जुलैला प्रवेश फेरीचा पहिला टप्पा
शुक्रवारी अकरावी प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी, पालक ६ व ८ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील त्रुटी आणि हरकती संबंधित उपसंचालक कार्यालयात नोंदवू शकतील. त्यानंतर १२ जुलै २०१९ रोजी प्रवेशाच्या पहिल्या फेरीचा टप्पा पार पडेल. याच दिवशी उपसंचालक कार्यालयाकडून उपलब्ध जागांसाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल.

- अर्ज निश्चित झालेल्यांमध्ये आयसीएसई मंडळाचे ७ हजार ८८१ तर आयबी मंडळाचे ७ विद्यार्थीच आहेत. यामध्ये आयजीसीएसईच्या ९०८ तर एनआयओएस मंडळाच्या ५९८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर अन्य १ हजार ११९ विद्यार्थी असल्याची माहिती उपसंचालक कार्यालयाने दिली.
- अकरावीच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीकडे विद्यार्थ्यांसह पालकांचेही लक्ष लागले आहे. कारण ही गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरच पुढील भवितव्याला खºया अर्थी आकार मिळणार आहे. त्यामुळे आता यादी जाहीर होऊन कुठे प्रवेश मिळणार, अशी चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना आहे.

शाखा प्रवेश क्षमता
कला ३७,०७१
वाणिज्य १,७४,०४६
विज्ञान १,०२,४०९
एचएसव्हीसी ५,६६०
एकूण ३,१९,१८६

शाखा एकूण अर्ज
मुली ९२,२२०
मुले ९३,२५७
एकूण १,८५,४७७

क्षेत्र एकूण अर्ज
एमएमआर १,७६,०१९
ओएमएमआर ७,४२९
ओएमएस २०,२०९
एकूण १,८५,४७७

Web Title: List of eleventh general quality today; 1 lakh 85 thousand 477 applications from Mumbai division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.