Join us

फेरीवाला क्षेत्रांची यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 2:53 AM

गेली तीन वर्षे रखडलेल्या शहर फेरीवाला नियोजन समितीच्या स्थापनेनंतर फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीला गती मिळाली आहे. त्यानुसार, मुंबईतील १,१०० रस्त्यांवर फेरीवाला क्षेत्र घोषित करण्यात आले आहे..

मुंबई : गेली तीन वर्षे रखडलेल्या शहर फेरीवाला नियोजन समितीच्या स्थापनेनंतर फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीला गती मिळाली आहे. त्यानुसार, मुंबईतील १,१०० रस्त्यांवर फेरीवाला क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या रस्त्यांची यादी संकेतस्थळावरून जाहीर करण्यात आली आहे. मात्र, स्थानिक रहिवाशांकडून विरोधाची शक्यता असल्याने, त्यावर तत्काळ निर्णय घेण्यासाठी पालिकेने १८ डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना मागविल्या आहेत.महापालिकेने सन २०१५ मध्ये पहिल्यांदा फेरीवाला व ना फेरीवाला क्षेत्राची यादी जाहीर केली होती. मात्र, दक्षिण मुंबई आणि वांद्रे पाली हिल येथील स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्यामुळे हे नियोजन बारगळले. एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर या धोरणाला वेग मिळाला आहे. गेल्या आठवड्यात शहर फेरीवाला समितीमधील १२ सदस्यांची नियुक्ती केल्यानंतर, मुंबईतील १,१०० रस्त्यांवर फेरीवाल्यांना जागा निश्चित करण्याची तयारी सुरू झाली आहे.या वेळेस नागरिकांचा विरोध होऊन संभाव्य विलंब टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने या रस्त्यांची यादी संकेत स्थळावरून जाहीर केली आहे. नागरिकांनी त्यांच्या सूचना व हरकती १८ डिसेंबर २०१७ पर्यंत महापालिकेकडे ईमेलद्वारे पाठवाव्यात, असे आवाहन अनुज्ञापन अधीक्षक शरद बांडे यांनी केले आहे. जुलै २०१४ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ९९ हजार ४३५ अर्ज आले आहेत. त्यांची छाननी व योजनेतील निकषांच्या आधारावर फेरीवाल्यांची नोंदणी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.९९ हजार ४३५ फेरीवाले ठरले पात्रसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व २४ विभागांतील २२ हजार ९७ ‘पिचेस’ला मान्यता देण्यात आली आहे.मुंबईतील १,१०० रस्त्यांवर ८९ हजार फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.मुुंबईत केवळ १५ हजार १५९ परवानाधारक फेरीवाला आहेत.२०१४ मध्ये पालिकेने मागविलेल्या अर्जानुसार सव्वा लाख फेरीवाल्यांचे अर्ज आले. यामध्ये ९९ हजार ४३५ फेरीवाले पात्र ठरले आहेत.याबाबतची यादी महापालिकेच्या  https://portal.mcgm.gov.in  या संकेतस्थळावरील ‘जलद दुवे’(Quick Links) या लिंक अंतर्गत उपलब्ध.नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना tvcmcgm@gmail.comया ईमेल पत्त्यावर १९ डिसेंबर २०१७ पर्यंत पाठवायच्या आहेत

टॅग्स :फेरीवाले