मुंबई : बंडखोरीच्या भीतीने शिवसेना-भाजपा-काँग्रेसमध्ये उमेदवारी जाहीर करण्यास वेळ लावला जात आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आपली तिसरी यादी जाहीर करून मोकळी झाली आहे. उमेदवारांच्या पहिल्या दोन याद्यांमध्ये विद्यमान नगरसेवक व त्यांच्या नातेवाइकांना उमेदवारी दिल्यानंतर आता माजी नगरसेविकेलाही या तिकिटाची लॉटरी लागली आहे. तसेच पदवीधर, अभियंता, परिचारिका यांना उमेदवारी मिळाली आहे.शिवसेना-भाजपाच्या युतीप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही सूर बिघडले आहेत. काँग्रेसमध्ये गटातटांचे राजकारण रंगात आहे. शिवसेना आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशा वेळी आपल्या उमेदवारांच्या याद्या एकापाठोपाठ एक जाहीर करण्याचा सपाट लावत उमेदवारांना निवडणुकीसाठी सज्ज केले आहे. आतापर्यंत एमआयएम, राष्ट्रवादी आणि समाजवादीने उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत घाटकोपरच्या नगरसेविका राखी जाधव, गटनेते धनंजय पिसाळ यांच्या पत्नी भारती पिसाळ व नगरसेवक हारून खान यांच्या नातेवाइकांना तिकीट मिळाले आहे. त्यानंतर आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये माजी नगरसेविका वनिता इन्सुलकर यांची वर्णी प्रभाग क्रमांक १९५ मध्ये लागली आहे. (प्रतिनिधी)क्र. वॉर्ड क्र. प्रवर्ग उमेदवाराचे नाव१ २ खुला सावंत गिरीश जगन्नाथ२ १३ खुला इनामदार ताजुद्दीन बद्रीउद्दीन३ १८ खुला कोंडविलकर तेजस विठ्ठल४ २५ महिला बेलोसे गिती सुरेश५ ३१ ओबीसी वसईकर सोनल संदीप६ ४८ ओबीसी शेख शरीफ हनिफ७ ५० खुला द्विवेदी चिंतामणी८ ५१ खुला चव्हाण सचिन सुमंत९ ५४ महिला पगारे वैशाली नाना१० ६० खुला जंगम विकास जगदीश११ ६२ ओबीसी पाटील राजेश मारुती१२ १०० ओबीसी महिला पंजाबी पिंकी नौशाद१३ १०५ महिला वैती भावेशी जयेश१४ ११४ खुला मर्गज विलास मनोहर१५ १२२ ओबीसी महिला वेंकटगिरी जया हनुमंता१६ १३० महिला गुप्ता पूनम सचिन१७ १३३ खुला धुमाळ बापू एस.१८ १३४ महिला अन्सारी तेहसिना सिराजुद्दीन१९ १६२ ओबीसी सहदेवन केशर सोहन२० १९१ महिला दळवी वंदना विजयकुमार२१ १९२ महिला कदम शीतल विजय२२ १९५ अनुसूचित जाती इन्सुलकर वनिता वसंत२३ २०० अनुसूचित जाती महिला कांबळे संजय अनिता२४ २०१ महिला जगताप ज्योती प्रकाश२५ २०५ खुला येवले उमेश रायसिंग२६ २२७ खुला कोकाटे संजय शंकर
राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर
By admin | Published: January 29, 2017 3:42 AM