मुंबईतील २० अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर

By सचिन लुंगसे | Published: May 29, 2024 07:35 PM2024-05-29T19:35:29+5:302024-05-29T19:35:42+5:30

२० इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या ४ इमारतींचा समावेश आहे.

List of 20 most dangerous buildings in Mumbai announced | मुंबईतील २० अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर

मुंबईतील २० अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर

मुंबई : म्हाडाच्यामुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे  मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून यावर्षी २० इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या २० इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या ४ इमारतींचा समावेश आहे.

अतिधोकदायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये ४९४ निवासी व २१७ अनिवासी असे एकूण ७११ रहिवासी/भाडेकरू आहेत.  ३६  निवासी भाडेकरू/रहिवाशांनी स्वतःची निवर्यााची   पर्यायी व्यवस्था केली आहे. तर आतापर्यंत ४६ रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित इमारतींमधील भाडेकरु/रहिवासी यांना घरे रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ४१२ निवासी भाडेकरू/रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार असल्याने नियोजन करण्यात आले आहे. संक्रमण शिबिरांत त्यांची पर्यायी व्यवस्था कारण्याबाबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.
 
२० अतिधोकादायक इमारतींची यादी
१) इमारत क्रमांक ४-४ ए,नवरोजी हिल रोड क्रमांक. १, जॉली चेंबर ( मागील वर्षीच्या यादीतील)
२) इमारत क्रमांक ५७ निझाम स्ट्रीट  
३) इमारत क्रमांक ६७, मस्जिद स्ट्रीट
४) इमारत क्रमांक ५२–५८, बाबु गेणु रोड
५) इमारत क्रमांक ७ खंडेराव वाडी/ २०४–२०८, काळबादेवी रोड
६) इमारत क्रमांक ५२ -५२ अ, २ री डेक्कन क्रॉस रोड
७) इमारत क्रमांक १२५–१२७ ए, जमना निवास, खाडीलकर रोड,गिरगाव
८) इमारत क्रमांक ३१४ बी, ब्रम्हांड को ऑप हौ सोसायटी, व्ही पी.रोड, गिरगाव
९) इमारत क्रमांक ४१८–४२६  एस.व्ही.पी रोड,(१२४ ते १३४ए ) गोलेचा हाऊस
१०) इमारत क्रमांक ८३ – ८७ रावते इमारत, जे.एस.एस.रोड, गिरगाव
११) इमारत क्रमांक  २१३–२१५ डॉ.डी.बी.मार्ग
१२) इमारत क्रमांक ३८–४०  स्लेटर रोड
१३) ९ डी चुनाम लेन
१४) ४४ इ नौशीर भरुचा मार्ग
१५) १ खेतवाडी १२ वी लेन
१६) ३१ सी व ३३ ए ,आर रांगणेकर मार्ग व १९ पुरंदरे मार्ग , गिरगाव चौपाटी  ( मागील वर्षीच्या यादीतील)
१७) इमारत क्रमांक  १०४-१०६ ,मेघजी बिल्डिंग, अ , ब व क विंग , शिवदास चापसी मार्ग ( मागील वर्षीच्या यादीतील)  
१८) इमारत क्रमांक  ५५-५९–६१–६३–६५ सोफीया झुबेर मार्ग
१९) इमारत क्रमांक ४४-४८, ३३-३७  व ९-१२ कामाठीपुरा ११ वी व १२ वी गल्ली, देवल बिल्डींग
२०) अंतिम भूखंड क्रमांक  ७२१ व ७२४ टीपीएस - ३ विभाग, इमारत क्रमांक ४० बी व ४२८, उपकर क्र ग उत्तर ५०-९५ (१) आणि ग उत्तर -५१०३ आत्माराम बिल्डिंग व पेनकर चाळ (मागील वर्षीच्या यादीतील)
 
म्हाडाचा नियंत्रण कक्ष
रजनी महल, पहिला मजला, ८९-९५, ताडदेव रोड, ताडदेव,
दूरध्वनी क्रमांक - २३५३६९४५, २३५१७४२३.
भ्रमणध्वनी क्रमांक - ९३२१६३७६९९
 
महापालिकेचा नियंत्रण कक्ष
पालिका मुख्यालय, फोर्ट
दूरध्वनी क्रमांक : २२६९४७२५/२७

Web Title: List of 20 most dangerous buildings in Mumbai announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.