Join us

मुंबईतील २० अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर

By सचिन लुंगसे | Published: May 29, 2024 7:35 PM

२० इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या ४ इमारतींचा समावेश आहे.

मुंबई : म्हाडाच्यामुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे  मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून यावर्षी २० इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या २० इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या ४ इमारतींचा समावेश आहे.

अतिधोकदायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये ४९४ निवासी व २१७ अनिवासी असे एकूण ७११ रहिवासी/भाडेकरू आहेत.  ३६  निवासी भाडेकरू/रहिवाशांनी स्वतःची निवर्यााची   पर्यायी व्यवस्था केली आहे. तर आतापर्यंत ४६ रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित इमारतींमधील भाडेकरु/रहिवासी यांना घरे रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ४१२ निवासी भाडेकरू/रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार असल्याने नियोजन करण्यात आले आहे. संक्रमण शिबिरांत त्यांची पर्यायी व्यवस्था कारण्याबाबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. २० अतिधोकादायक इमारतींची यादी१) इमारत क्रमांक ४-४ ए,नवरोजी हिल रोड क्रमांक. १, जॉली चेंबर ( मागील वर्षीच्या यादीतील)२) इमारत क्रमांक ५७ निझाम स्ट्रीट  ३) इमारत क्रमांक ६७, मस्जिद स्ट्रीट४) इमारत क्रमांक ५२–५८, बाबु गेणु रोड५) इमारत क्रमांक ७ खंडेराव वाडी/ २०४–२०८, काळबादेवी रोड६) इमारत क्रमांक ५२ -५२ अ, २ री डेक्कन क्रॉस रोड७) इमारत क्रमांक १२५–१२७ ए, जमना निवास, खाडीलकर रोड,गिरगाव८) इमारत क्रमांक ३१४ बी, ब्रम्हांड को ऑप हौ सोसायटी, व्ही पी.रोड, गिरगाव९) इमारत क्रमांक ४१८–४२६  एस.व्ही.पी रोड,(१२४ ते १३४ए ) गोलेचा हाऊस१०) इमारत क्रमांक ८३ – ८७ रावते इमारत, जे.एस.एस.रोड, गिरगाव११) इमारत क्रमांक  २१३–२१५ डॉ.डी.बी.मार्ग१२) इमारत क्रमांक ३८–४०  स्लेटर रोड१३) ९ डी चुनाम लेन१४) ४४ इ नौशीर भरुचा मार्ग१५) १ खेतवाडी १२ वी लेन१६) ३१ सी व ३३ ए ,आर रांगणेकर मार्ग व १९ पुरंदरे मार्ग , गिरगाव चौपाटी  ( मागील वर्षीच्या यादीतील)१७) इमारत क्रमांक  १०४-१०६ ,मेघजी बिल्डिंग, अ , ब व क विंग , शिवदास चापसी मार्ग ( मागील वर्षीच्या यादीतील)  १८) इमारत क्रमांक  ५५-५९–६१–६३–६५ सोफीया झुबेर मार्ग१९) इमारत क्रमांक ४४-४८, ३३-३७  व ९-१२ कामाठीपुरा ११ वी व १२ वी गल्ली, देवल बिल्डींग२०) अंतिम भूखंड क्रमांक  ७२१ व ७२४ टीपीएस - ३ विभाग, इमारत क्रमांक ४० बी व ४२८, उपकर क्र ग उत्तर ५०-९५ (१) आणि ग उत्तर -५१०३ आत्माराम बिल्डिंग व पेनकर चाळ (मागील वर्षीच्या यादीतील) म्हाडाचा नियंत्रण कक्षरजनी महल, पहिला मजला, ८९-९५, ताडदेव रोड, ताडदेव,दूरध्वनी क्रमांक - २३५३६९४५, २३५१७४२३.भ्रमणध्वनी क्रमांक - ९३२१६३७६९९ महापालिकेचा नियंत्रण कक्षपालिका मुख्यालय, फोर्टदूरध्वनी क्रमांक : २२६९४७२५/२७

टॅग्स :मुंबईम्हाडा