Join us

एफवाय प्रवेशाच्या दुसऱ्या यादीचा आलेखही चढाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 6:16 AM

एफवाय प्रवेशाच्या दुस-या यादीचा आलेखही चढाच राहिला. शनिवारी जाहीर झालेली गुणवत्ता यादी ही नव्वदीपारच राहिली असून, काही अभ्यासक्रमांसाठी तर प्रवेशच बंद करण्यात आले आहेत.

मुंबई : एफवाय प्रवेशाच्या दुस-या यादीचा आलेखही चढाच राहिला. शनिवारी जाहीर झालेली गुणवत्ता यादी ही नव्वदीपारच राहिली असून, काही अभ्यासक्रमांसाठी तर प्रवेशच बंद करण्यात आले आहेत. सेल्फ फायनान्ससाठीचे प्रवेश नव्वदीपारच असल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी जाहीर झालेल्या पहिल्या यादीपेक्षा कॉमर्स आणि आर्टस् कॉलेजमधील कट-आॅफ दोन ते तीन टक्क्यांनी खाली आला, तर सायन्स शाखेचा कट-आॅफ सर्वात खाली असल्याचे दिसून आले. मात्र, तरीही या यादीनंतर अनेक नामांकित महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याने, या महाविद्यालयांमधील प्रवेशाची दारे बंद झाली आहेत.दुस-या यादीनंतर अनेक नामांकित महाविद्यालयांचे प्रवेश बंद झाल्याने, ७० ते ८० टक्के मिळालेल्या विद्यार्थी आता तिस-या यादीच्या प्रतीक्षेत आहेत.>दुस-या यादीनंतरचे कट-आॅफकेसी कॉलेजबी कॉम (विनाअनुदानित ) - ९४%एफवाय बीए - ८९ %एफवाय बीसीएससी- ६०%बीएमएमएफवाय बीए - ९२ . २० %एफवाय बीकॉम - ९२. ३१ %एफवाय बीसीएससी - ९० %बीएमएसएफवाय बीए - ८६ %एफवाय बीकॉम - ९४ %एफवाय बीसीएससी - ८८.२० %बीएएफ - ९२ %बीबीआय - ८३. २० %बीएफएम - ८९. ८० %बीएससी आयटी - ६६%बीएससी बीटी- ७८. २० %बीएससी सीएस - ६७. ५४ %वझे केळकर कॉलेज, मुलुंडरेग्युलर बीकॉम आणि सेल्फ फायनान्स १ ते २ टक्क्यांनी खालीएफवाय बीए - जागा उपलब्ध नाहीएफवाय बीकॉम - ७३. ८ %एफवाय बीसीएससी - ८६. ४६%(सेल्फ फायनान्स)बीएससी आयटी - ८१%बीएससी बीटी- ७९. ६९ %बीएमएमएफवाय बीए - जागा उपलब्ध नाहीएफवाय बीकॉम - ८५. ६९ %एफवाय बीसीएससी -७५. ५४ %बीएमएसएफवाय बीए - ५३. ४० %एफवाय बीकॉम - ८५. ८५ %एफवाय बीसीएससी - ७४. ९२ %झेविअर्स कॉलेजएफवाय बीए - ९१ . ८ %एफवाय बीसीएससी - ८६ %बीएमएम - ८३. ८४ %बीएमएस - ७३ . ७२ %बीएससी आयटी - ८८%साठ्ये कॉलेजबीएमएसएफवाय बीकॉम - ८३.८३%एफवाय बीसीएससी - ६९.३३ %मिठीबाई कॉलेजएफवाय बीए - ९४. २ %एफवाय बीकॉम - ९०. ६० %एफवाय बीसीएससी- जागा उपलब्ध नाहीबीएमएसएफवाय बीए - ८८. ६ %एफवाय बीकॉम - ९४. ६ %एफवाय बीसीएससी- ८९.५४ %रुईया कॉलेजएफवाय बीएससी(अनुदानित )- ७८. ९२ %सेल्फ फायनान्सबीएससी बीटी- ८६. २%बीएससी सीएस - ८२ %बीएमएमएफवाय बीए - ८८. ८ %एफवाय बीकॉम - ९० .%एफवाय बीसीएससी - ८८.८%सेंट अँड्र्यूज कॉलेजएफवाय बीए - ८५ %एफवाय बीकॉम - ८२.६० %बीएमएसएफवाय बीए - ७७. ३८ %एफवाय बीकॉम - ८८. ४%बीएमएमएफवाय बीए - ८४. ७७ %एफवाय बीकॉम - ८८. ८ %बीएससी आयटी - ६०%>या वेळी सेल्फ फायनान्सकडे ओढा जास्त दिसून आला. मात्र, अनेकदा वैद्यकीय व इतर अभ्यासक्रमांत प्रवेशाची वाट पाहत असल्याने, विद्यार्थी येथील प्रवेश रद्द करत असल्याने आताच काही सांगता येणार नाही.- मिलिंद जोशी, प्राचार्य, साठ्ये कॉलेज