मुंबई – आगामी मुंबई महापालिकेच्या दृष्टीने शहरातील वातावरण तापायला लागलं आहे. मागील ३५ वर्षापासून शिवसेनेची एकहाती सत्ता मुंबईवर आहे. परंतु आता शिवसेनेची आर्थिक नाडी असलेल्या महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी भाजपानं कंबर कसली आहे. मागील निवडणुकीत भाजपानं तब्बल ८२ नगरसेवक निवडून आणत शिवसेनेला कडवी झुंज दिली होती. त्यामुळे आगामी महापालिका(BMC Election) निवडणूक शिवसेना-भाजपा यांच्यासाठी महत्त्वाची असणार आहे.
त्यातच शिवसेनेचे कट्टर वैरी असलेले नारायण राणे(Narayan Rane) यांनी केंद्रीय मंत्री बनवल्यानंतर आता राणेंचा महापालिका निवडणुकीत फायदा करण्याची भाजपाची खेळी आहे. नारायण राणे यांच्यावर महापालिका निवडणुकीची जबाबदारी आहे का? असा प्रश्न लोकमतच्या मुलाखतीत आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांना विचारण्यात आला. त्यावर नितेश राणे म्हणाले की, नारायण राणे यांना मुंबईच्या राजकारणाबद्दल प्रचंड अनुभव आहे. हा नेता आशिष शेलार, लोढा यांच्या सगळ्यांसोबत उभा राहिला तर गेल्या ३५ वर्षापासून मुंबईत जी सत्ता आहे. बेजबाबदार कारभार सुरु आहे. त्याला चांगला पर्याय देता येईल. परंतु अद्याप राणेंवर महापालिकेची धुरा दिल्याची कुठलीही अधिकृत माहिती नाही. पण त्याचसोबत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना(Shivsena) निवडणूक लढणार असेल तर त्यासाठी शुभेच्छा आहे. कारण त्यांच्यामुळे तर भाजपासाठी(BJP) ही निवडणूक सोप्पी जाईल असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे.
“महाराष्ट्रात ‘हिंदु खतरे में है’ म्हणण्याची वेळ आलीय; उद्धव ठाकरेंनी केवळ हिरवे कपडे घालणं बाकी”
तसेच सगळे जुने शिवसैनिक बाजूला पडलेत. गेल्या २ वर्षाच्या काळात जुने शिवसैनिक कुठेही दिसत नाही. जुन्या शिवसैनिकांचा पूर्ण पाठिंबा भाजपाला आहे. ही बाळासाहेबांची शिवसेना, हिंदुत्ववादी शिवसेना राहिली नाही. बाळासाहेबांच्या तालमीतला शिवसैनिक, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार शिवाजी पार्कवर बसून ऐकलेत त्यांना हे कदापि हे सहन न होणार आहे. जुने शिवसैनिक म्हणून नारायण राणे बाळासाहेबांच्या स्मारकाला नतमस्तक व्हायला गेले होते. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्याचे पडसाद पाहायला मिळतील.
"राणे-राज-उद्धव हे एकत्र आले असते तर...; परंतु ‘त्या’ लोकांना हे नकोय", नितेश राणेंचा गौप्यस्फोट
अनेक नेत्यांची यादी तयार आहे. केवळ देवेंद्र फडणवीस, लोढा यांनी टीक करणं बाकी आहे. महाविकास आघाडी मूळ शिवसैनिकांना आवडली नाही. त्यामुळे हिंदुत्ववादी शिवसैनिकांना हे पटलं नाही. बाळासाहेबांची शिवसेना कुणी संपवली असेल तर ती ही नाईट लाइफ वाल्यांनी संपवली आहे. मग प्रचारात दिनो मोरिया, दिशा पटानी दिसतील आणि जुने शिवसैनिक मागेच राहतील असं सांगत नितेश राणे यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी काही नेते भाजपात प्रवेश करतील असे संकेत दिले आहेत.
‘तो’ राणे कुटुंबासाठी भावनिक क्षण; आई-वडिलांबाबत बोलताना आमदार नितेश राणे भावूक
पाहा व्हिडीओ -