मुंबई : वडाळ्याच्या राजाच्या मंडप उभारण्यास परवानगी देण्यापूर्वी तेथील स्थानिकांच्या तक्रारी ऐकून घ्या आणि मगच परवानगी द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला मंगळवारी दिले.वडाळा येथील रहिवासी राजन शाह, संजय देढीया आणि अन्य १० रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेनुसार, मंडप १५ फूट रुंद गल्लीमध्ये बांधण्यात येणार आहे. या गल्लीतील लोकांच्या घरातील सूर्यप्रकाश आणि हवा या मंडपामुळे अडते.लोकांच्या हितासाठी आयोजकांना आणि अनिल चॅरिटी ट्रस्टला हे मंडप न उभारण्याचे निर्देश द्यावे. २०१०च्या जनहित याचिकेत उच्च न्यायालयाने आखलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे याचिकादारांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले. मंडप अत्यंत अरुंद रस्त्यावर उभारण्यात येते. तसेच फायर इंजिनला प्रवेशही करता येऊ शकत नाही, असे याचिकेत म्हटले आहे.त्यावर मंडळाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, मंडळाचा अर्ज पालिकेकडे प्रलंबित आहे आणि पालिका केव्हाही या अर्जावर निर्णयघेईल.>२५ वर्षांची परंपराकोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० दिवसांच्या उत्सवाऐवजी केवळ दीड दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.२५ वर्षे जुनी परंपरा असल्याचे मंडळाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
‘वडाळ्याचा राजा’ बसवण्याआधी स्थानिकांचे म्हणणे ऐका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 2:05 AM