विद्या बालनशी थेटभेट
By Admin | Published: June 19, 2014 10:30 PM2014-06-19T22:30:51+5:302014-06-19T22:30:51+5:30
महिलांना करिअर निवडताना गुप्तहेर (डिटेक्टीव्ह)सारखे धाडसी आणि आव्हानात्मक करिअरही निवडता येऊ शकते.
>मुंबई : सध्याच्या काळात सर्वच क्षेत्रंमध्ये आघाडीवर असलेल्या महिलांना करिअर निवडताना गुप्तहेर (डिटेक्टीव्ह)सारखे धाडसी आणि आव्हानात्मक करिअरही निवडता येऊ शकते. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी महिलांना अभिनेत्री विद्या बालनची थेटभेट घेण्याची संधी मिळणार आहे ती ‘लोकमत’तर्फे 21 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘नया आसमान नयी उडान’ या कार्यक्रमात. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात दुपारी 2.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
अभिनेत्री विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेला ‘बॉबी जासूस’ या सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात विद्या एका अनोख्या हेरगिरी करणा:या भूमिकेत दिसणार आहे. या पाश्र्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, याबाबत महिलांमध्ये कमालीचे औत्सुक्य निर्माण झाले आहे. महिलांसाठी विशेष लक्षणीय ठरणा:या कार्यक्रमात विद्या बालनसोबत गप्पा मारण्याची संधी मिळणार आहे. या चर्चेत रंग भरण्यासाठी प्रसिद्ध महिला गुप्तहेर रजनी पंडित याही उपस्थित राहणार आहेत. या वेळी पंडित आपले हेरगिरीचे अनेक थरारक अनुभव कथन करतानाच गुप्तहेर होण्यासाठी लागणा:या विविध कौशल्यांबद्दलही मार्गदर्शन करतील. आपापल्या क्षेत्रत प्रसिद्ध असलेल्या या अनेक मान्यवर महिलांशी चर्चा केल्यानंतर उपस्थितांसाठी शानदार म्युङिाकल शोचे आयोजन केले आहे. एकूणच सर्व वातावरण ‘जासूसमय’ होणार असल्याने प्रेक्षकांनी याचा आनंद लुटावा. लवकरच प्रदर्शित होणा:या ‘बॉबी जासूस’ या चित्रपटाची निर्मिती दिया मिङर आणि साहिल संघा यांनी केली आहे तर समर शेख यांचे दिग्दर्शन या चित्रपटास लाभले आहे. विद्यासोबतच या चित्रपटात अली फझल, विनय वर्मा, सुप्रिया पाठक यांच्याही भूमिका आहेत. (प्रतिनिधी)