बेस्ट दिलासा! यंदा बस भाडेवाढ नाही; तुटीचा अर्थसंकल्प सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 04:57 PM2018-10-08T16:57:44+5:302018-10-08T17:44:14+5:30
बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांना बेस्ट भवनमध्ये अर्थसंकल्प सादर केला.
मुंबई : विविधा कारणांनी गेल्या काही वर्षांपासून तोट्यात जात असलेल्या बेस्ट उपक्रमाचा सन 2019-20 या आर्थिक वर्षातील 720.54 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प बेस्ट समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांना बेस्ट भवनमध्ये अर्थसंकल्प सादर केला. यंदा बस भाडेवाढ करण्यात येणार नसल्याचे बागडे यांनी सांगितले.
तोट्यात रुतलेली बस आता कात टाकणार आहे. हायटेक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बेस्टकडून विविध सुविधा देण्यात येणार आहेत. इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यानुसार प्रवाशांना बसथांब्यावर बस येण्याची अचूक वेळ कळणार आहे. पॅसेंजर इन्फॉरमेशन सिस्टमद्वारे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसचे ठिकाण तसेच येणाऱ्या बसथांब्याची माहिती उद्घोषणेद्वारे मिळणार आहे.
31 मार्च 2020 पर्यंत बसताफा 4050 पर्यंत वाढविण्यात येणार आहे.
या सुविधा मिळणार
एकच प्रवास कार्ड (कॉमन मोबिलिटी कार्ड) अंतर्गत रेल्वे, बेस्ट, मेट्रो, मोनो व इतर सार्वजनिक वाहतूक प्राधिकरणे यामधून प्रवासाकरिता एकच प्रवास कार्ड उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे बेस्टची तिकिट क्रेडिट, डेबिट स्वाईप सुविधा, मोबाईल तिकिट सुविधा मिळणार आहे.