गणेश गल्लीच्या राजाचं थाटात विसर्जन; तर मुंबापुरी दुमदुमली बाप्पाच्या जयघोषात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 08:11 AM2017-09-05T08:11:10+5:302017-09-06T04:26:55+5:30

गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर मंगळवारी शहरातील 199 ठिकाणी बहुतांश मोठ्या बाप्पांसह घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात विशेष बंदोबस्ताची आखणी केली आहे.

LIVE - The start of the celebration of Ganeshagalli Ganapati's immersion procession began | गणेश गल्लीच्या राजाचं थाटात विसर्जन; तर मुंबापुरी दुमदुमली बाप्पाच्या जयघोषात

गणेश गल्लीच्या राजाचं थाटात विसर्जन; तर मुंबापुरी दुमदुमली बाप्पाच्या जयघोषात

Next

मुंबई, दि. 5 - गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर मंगळवारी शहरातील 199 ठिकाणी बहुतांश मोठ्या बाप्पांसह घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात विशेष बंदोबस्ताची आखणी केली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेसोबतच सुरक्षेसाठी सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.  दरम्यान, मुंबईतील गणेशगल्ली गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.   पुढल्या वर्षी लवकर या, असं म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत.  

LIVE UPDATES

लालबागचा राजा भायखळा पोलीस ठाण्याजवळ दाखल. राजाला निरोपासाठी भाविकांचा जल्लोष.

लालबागचा राजा भायखळ्याजवळ दाखल. राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी.

 गणेश गल्लीच्या राजाचं विसर्जन संपन्न.


गिरगाव चौपाटीवर आदित्य ठाकरेंची हजेरी, गणेश विसर्जनाचा घेतला आढावा.

गणेशगल्लीचा राजा गिरगावच्या दिशेने मार्गस्थ.

चिंचपोकळीचा चिंतामणी गिरगावच्या दिशेने मार्गस्थ.

लालबागचा राजा थाटात मार्गस्थ. लालबागच्या राजावर श्रॉफ बिल्डिंगजवळ पुष्पवृष्टी.

गिरगावचा राजा ढोलताश्यांच्या गजरात चौपाटीकडे मार्गस्थ.

परळचा राजा विसर्जनसाठी थाटात मार्गस्थ.

चिंचपोकळीचा चिंतामणी गिरगावच्या दिशेने मार्गस्थ.


मुंबई : गिरगावच्या राजाची विसर्जन मिरवणुक थाटात सुरू. गिरगावच्या महाराजाच्या परंपरेनुसार महाराची छोटी मूर्ती ही विसर्जन मिरवणुकी आधी आजूबाजूच्या वाड्यामध्ये पालखीतुन फिरवण्यात येते.  या सर्व वाड्यातून फिरवून आणल्यावर गिरगावचा महाराजा मंडपातून बाहेर पडतो.

कोळी नृत्याने लालबागच्या राजाला निरोप

लालबागचा राजा थाटामाटात विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ  

लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचा जल्लोष 

 मुंबईचा राजा गणेश गल्लीच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक  

घोडपदेवचा राजाची मिरवणूक

भायखळ्यातील गिरणी कामगारांचा गणपती म्हणून घोडपदेवचा राजाची ओळख आहे.

गणपती बाप्पा... पुढच्या वर्षी लवकर या ऽऽऽ, विसर्जन मिरवणुकांची जय्यत तयारी

ढोल-ताशाच्या गजरात, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे बाप्पाला आवाहन करीत, ठिकठिकाणाहून गणेश विसर्जन मिरवणुका विसर्जन स्थळाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. अवघी मुंबापुरी गणेशाच्या नामाने दुमदुमून जाणार आहे. ‘निरोप देतो, आम्हा आता आज्ञा असावी...’ असे म्हणत, पाणावलेल्या डोळ्यांनी भक्तगण आपल्या लाडक्या बाप्पाला ‘पुढच्या वर्षी लवकर या,’ असे म्हणत आज निरोप देणार आहेत.
‘लालबागचा राजा’, ‘गणेशगल्लीचा गणपती’ आणि ‘अंधेरीचा राजा’, ‘गिरगावचा राजा’ची विसर्जन मिरवणूक, मंगळवारी सकाळीच १०च्या सुमारास सुरू होते आणि मग बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक विसर्जन स्थळांच्या ठिकाणी कूच करताना दिसून येतात. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी लाखो मुंबईकर गणेशभक्त रस्त्यावर उतरताना दिसतात. मुंबईत सध्या चोहीकडचे वातावरण भक्तिमय झालेले पाहायला मिळत आहे. छोट्या घरगुती गणपतीपासून ‘लालबागचा राजा’ची मोठ्या थाटात विसर्जन मिरवणूक धूमधडाक्यात निघते. लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी मिरवणूक मार्गावर भक्तांचा जनसागर उसळतो. लालबागचा राजावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येते. अनेक ठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या काढण्यात येतात, तर ढोल-ताशांच्या आवाजाने आणि भक्तांचा जल्लोषाने वातावरणात गुलालासह भक्तीचाही रंग उधळला जातो. बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीसह अनेक विसर्जन स्थळे तसेच विसर्जन मिरवणुकांनीही जय्यत तयारी केली आहे.
बेस्टच्या गाड्यांत कपात-
अनंत चतुर्दशीदिवशी मुंबई शहर व उपनगरातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेस्ट मार्ग वळविण्यात येतात. या दिवशी बसगाड्यांमधून प्रवास करणाºया प्रवाशांची संख्याही
कमी असते. परिणामी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बसगाड्यांमध्ये कपात करण्यात येणार आहे. या दिवशी दुपारी २.३० नंतर एकूण ३४०७ बसगाड्यांपैकी १६८७ बसगाड्या सुरू राहणार आहेत.
विसर्जनादिवशी विशेष ८ लोकल फे-या-
गणरायाच्या विसर्जनानिमित्त मध्य रेल्वे ८ विशेष लोकल फेºया चालविण्यात येतील. मध्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण/ठाणे आणि कल्याण/ठाणे ते सीएसएमटी अशा प्रत्येकी २ लोकल चालविण्यात येतील. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल आणि पनवेल ते सीएसएमटी मार्गावर प्रत्येकी २ फे-या होणार आहेत.
अनंत चतुर्दशीच्या मध्यरात्री १.३० वाजता सुटणारी लोकल कल्याणला मध्यरात्री ३ वाजता पोहोचेल. दुसरी लोकल सीएसटीएमहून मध्यरात्री २.३० वाजता सुटेल. कल्याणहून मध्यरात्री १ वाजता सुटणारी लोकल सीएसएमटीला मध्यरात्री २.३० वाजता पोहोचणार आहे. ठाणे येथून २ वाजता सुटणारी लोकल सीएसटीएमला मध्यरात्री ३ वाजता पोहोचणार आहे.

Web Title: LIVE - The start of the celebration of Ganeshagalli Ganapati's immersion procession began

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.