Join us

Milk Supply Live Update - स्वाभिमानीचं दूध आंदोलन चिघळलं, हडपसरमध्ये गोकूळ दुधाचा टँकर फोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 7:27 AM

पोलिसांनी मुंबईतल्या दूध गाड्यांना संरक्षण दिलं आहे

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाची दरवाढ व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट प्रतिलीटर पाच रुपये जमा करण्याच्या मागणीसाठी पुकारलेलं आंदोलन आजही सुरूच ठेवलं आहे. पुण्यातल्या हडपसर येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गोकूळ दुधाचा टँकर फोडला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबईतल्या दूध गाड्यांना संरक्षण दिलं आहे. 

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यांत सोमवारी शेतकऱ्यांनी दूधच न घातल्याने दूध संकलन जवळपास ठप्प झाले होते. दूध आंदोलनाचा परिणाम पहिल्या दिवशी मुंबई शहर व उपनगरांत जाणवला नव्हता. दूध वितरक व डेअरीचालकांकडे पुरेसे दूध उपलब्ध होते. आंदोलन दोन-तीन दिवस सुरू राहिल्यास टंचाई जाणवू शकते.

LIVE UPDATES - 

- सांगलीतून मुंबईला पोलीस बंदोबस्तात दूधाची वाहतूक

- उदगावमध्ये पोलीस बंदोबस्तात दुधाचे टँकर दाखल 

- उदगावमध्ये दूधाचे सात ट्रॅकर फोडले

- बीड जिल्ह्यातील पाली गावात दुधाचा टँकर फोडण्यात आला 

- सोलापूर - माळशिरस येथील शिवामृत दूध संघाचे संकलन करणाऱ्या गाडीतील दूध संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतले

- सोलापूर - दूध दरवाढ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महूद येथे रस्ता रोको आंदोलन

- सोलापूर - रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन धारकांना केले दूध वाटप

- पुण्यातील दूधसाठा संपण्याच्या मार्गावर, उद्यापासून चितळेही बंद

- पालघर - गुजरातहून येणारा दुधाचा टँकर राजू शेट्टी यांनी पालघर येथे अडवला

- मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून प्रश्न निकाली लावण्याची मागणी

-  विधान परिषदेत विरोधकांचा दूध प्रश्नावरून गदारोळ

- गायीच्या दुधाला 27 रुपये दर मिळत नाही, प्रतिलिटरमागे 10 रुपयांचं शेतकऱ्यांना नुकसान - मुंडे

- परराज्यातून येणाऱ्या दुधावर तातडीने कर लावा, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेत मागणी

- सरकारला वाटत असेल की, उद्या रिलायन्सचं दूध येईल, रामदेव बाबाचं दूध येईल, तर त्याची वाट पाहू नये, लवकर निर्णय घ्या - धनंजय मुंडे

- दूध प्रश्नावर चर्चा - मंत्री प्रामाणिक प्रयत्न करत असतील, तर घोडं कुठं पेंड खातंय? - धनंजय मुंडे

- 3 मे रोजी शेतकऱ्यांनी मोफत दूध वाटपाचं आंदोलन केलं होतं, त्यावेळी सरकारला कळलं नाही का, हे शेतकरी उद्या आंदोलन करु शकतात - धनंजय मुंडे

- विधानपरिषदेत दूध प्रश्नावर चर्चा

- मुंबईचा दूध पुरवठा दुसऱ्या दिवशीही सुरळीत सुरू

- दूध पुरवठा सुरळीत व्हावा, अनुचित प्रकार घडू नये यासाठी दूधाच्या गाडीसोबत पोलिसांची एक गाडी फिरत आहे.

- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनाचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद पाहायला मिळत आहेत. 

- पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणावर दुधाचा पुरवठा रोखण्यात आला आहे. 

- पोलिसांनी मुंबईतल्या दूध गाड्यांना संरक्षण दिलं आहे

- पुण्यातल्या हडपसर येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गोकूळ दुधाचा टँकर फोडला

टॅग्स :दूध पुरवठादूधशेतकरी