जंतुंच्या प्रादुर्भावाचा धोका
By admin | Published: May 18, 2017 03:10 AM2017-05-18T03:10:26+5:302017-05-18T03:10:26+5:30
आपल्या शरीराची रचना ही खूपच रंजक आहे. अन्नांचे कण पचविण्यासाठी मेहनत करावी लागते, आॅक्सिजन शोषून, त्याला रक्तपुरवठा करणाऱ्या व अन्य घटकांच्या मदतीसाठी
- डॉ. चैताली लड्डाड, बालरोग तज्ज्ञ
आपल्या शरीराची रचना ही खूपच रंजक आहे. अन्नांचे कण पचविण्यासाठी मेहनत करावी लागते, आॅक्सिजन शोषून, त्याला रक्तपुरवठा करणाऱ्या व अन्य घटकांच्या मदतीसाठी पाठवून मेंदूचे काम सुरळीत करू शकतो, पण आपल्या शरीराच्या नेमक्या कार्यात अडथळा येतो, तो जंतुंच्या हल्ल्यांमुळे व त्यामुळे या कार्यात फार मोठे विघ्न येते. अत्यंत छोट्या आकाराचे हे प्राणी आपल्या शरीराच्या मुळाशी जातात आणि मोठ्या आजारांना त्यामुळे निमंत्रण मिळते. लहान मुलांवर तर हे हल्ले लगेचच होतात. अत्यंत घातक असे हे जंतू पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो, पण ते शरीरात ज्या वेळी प्रवेश करतात, त्या वेळी ते दिसत नाही. त्यांचे अस्तित्व आजार निर्माण झाल्यावर दिसणाऱ्या लक्षणांतून जाणवते. बरेचसे जंतू हानिकारक असतात. प्रोबायोटिक्स प्रकारचे जंतू हे जीवाणू, बुरशी, विषाणू हे वाईट प्रकारचे जंतू आहेत, त्यामुळे घशाला दुखापत होते. सर्वच प्रकारचे जीवाणू हानिकारक नसतात, काही शरीराचे योग्य संतुलन ठेवण्यासाठी आवश्यकदेखील आहेत.
पालकांनी मुलांना आरोग्याविषयी माहिती देताना, तसेच जंतू व स्वच्छतेचे महत्त्व सांगताना अतिरेक करू नये. जंतुंचा हल्ला झाल्यानंतर होणाऱ्या परिणामांबद्दल हळुवारपणे व समजुतीने मुलांना सांगितले पाहिजे. आपली समजावण्याची पद्धत ही मुलांनी जंतुंपासून काळजी घ्यावी, तसेच जंतुमुक्त राहिले पाहिजे, हेच असावे. जंतुंपासून नियंत्रण आणि त्यांना दूर ठेवणे याचा कित्ता त्यांनी गिरवला पाहिजे. जंतुंचा प्रादुर्भाव हा हवेच्या माध्यमातून सहजरीत्या होऊ शकतो. शिंकताना किंवा खोकताना हे जंतू पसरतात. खाद्यपदार्थाबरोबरच हातमिळवणीने होणारा वैयक्तिक संपर्क, संसर्गबाधित व्यक्ती, मोकळ्या जागेत इतरांना झालेला स्पर्श, रस्त्यावरील उघडे पदार्थ, अस्वच्छ पाणी यांचे सेवन केल्यामुळे हे जंतू आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात व त्यांचा फैलाव होऊ शकतो.
जंतुंचा नायनाट साबण आणि पाण्याने होतो. त्यामुळे मुलांनी हात स्वच्छ धुतले का, स्वच्छता ठेवली का, यांची काळजी घेऊन हे हल्ला करणारे किटाणू शरीरात जाऊ न देण्याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. पाळीव प्राणी किंवा अन्य प्राण्यांच्या स्पर्शातून किटाणू मुलांच्या शरीरात प्रवेश करणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. प्राण्यांच्या अंगावरील मऊ केसातून अळ्या, तसेच अन्य हानिकारक जंतू इतरत्र पसरू शकतात. त्यामुळे अशा प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर त्वरित मुलांचे हात धुवावेत. आजारी माणसांजवळ मुलांना एकटे ठेवू नये किंवा एकट्याला भेटू देऊ नये, त्यांच्या संपर्काने त्यांच्यातील जंतू या मुलांमध्ये प्रसारित होऊ शकतात. शिंकताना किंवा खोकताना तोंड बंद ठेवण्याची सवय लावा. त्यामुळे जंतुंचा फैलाव होणार नाही. तोंडावर हात ठेवून खोकले, तर निश्चितपणे जंतुंचा फैलाव रोखण्यास मदत होऊ शकते.
या सर्व प्रकारांचा सामना करण्यासाठी नियमितपणे डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करा. रोगप्रतिकारक शक्तीचा सामना करण्यासाठी योग्य प्रकारचे लसीकरण करून घ्यावे. त्यामुळे शरीरात शिरकाव करणाऱ्या जंतुंचा प्रभावीपणे सामना करता येऊ शकेल. मुलांना सकस आहार द्या. त्यांना पुरेशी झोप घेऊ द्या. त्यामुळे आजारपणात जंतुंशी सामना करण्याची शक्ती त्यांच्यात येईल. मुलांना आपले अन्न किंवा जेवणाचा डबा इतरांनाही खायला द्यायची सवय असते. त्यामुळे या सवयीपासून त्यांना परावृत्त करा. आपल्या मुलांचा बिछान्यातील चादरी, उशांचे कव्हर, पडदे, कार्पेट, चोंदलेली खेळणी नियमितपणे स्वच्छ ठेवा. जंतूंची भरभराट करणारी ही प्रभावी माध्यमे आहेत. त्यामुळे ती जंतूविरहित करण्यावर भर द्या. आपले घर व मुलांच्या वस्तू स्वच्छ ठेवा. आपले स्वच्छतागृह स्वच्छ आणि निरोगी ठेवा. शौचाच्या भांड्यावर जीवाणू अधिक असतात. त्यामुळे ते नियमिपणे स्वच्छ ठेवा. स्वच्छतागृहातील भांडी, तसेच टॉवेलसारख्या वस्तूदेखील स्वच्छ ठेवा.
- पावसाळ्याच्या दिवसात मुलांचे हवेतील संसगार्मुळे आजारी होण्याचे प्रमाण अधिक असते. त्याचबरोबर डास आणि मच्छर यांचादेखील प्रादुर्भाव पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर होतो.
- पावसाच्या पाण्यात डास व मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे मलेरिया व डेंग्युसारखे आजार होतात. अशावेळी मुलांनी आपले हात व पाय स्वच्छ धुतले पाहिजे. घरी आल्यानंतर तसे करण्यावर ध्यान द्या तसेच त्यांना तशी सवय लावा.
- हिवाळ्यात सर्दी आणि खोकला हमखास होतोच. अशावेळी सर्दी व खोकला असणाऱ्यांच्या संपर्कात मुलांना येऊ देऊ नका. मुलांच्या संवेदनशील शरीररचनेमुळे त्यांना हे आजार लगेचच होऊ शकतात.
- मुले जर अशाप्रकारे सर्दी आणि खोकल्यांमुळे आजारी पडली तर निश्चितपणे उपरोक्त मार्गदर्शिकेनुसार काळजी घ्या आणि छोटे हानीकारक जिवाणूंचा त्यांच्या शरीरातील प्रवेश रोखण्यास त्यांची निश्चितपणे मदत होईल.
- जंतुंचा नायनाट साबण आणि पाण्याने होतो. त्यामुळे मुलांनी हात स्वच्छ धुतले का, स्वच्छता ठेवली का, यांची काळजी घेऊन हे हल्ला करणारे किटाणू शरीरात जाऊ न देण्याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. पाळीव प्राणी किंवा अन्य प्राण्यांच्या स्पर्शातून किटाणू मुलांच्या शरीरात प्रवेश करणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे.
- आजारी माणसांजवळ मुलांना एकटे ठेवू नये किंवा एकट्याला भेटू देऊ नये, त्यांच्या संपर्काने त्यांच्यातील जंतू या मुलांमध्ये प्रसारित होऊ शकतात. शिंकताना किंवा खोकताना तोंड बंद ठेवण्याची सवय लावा. त्यामुळे जंतुंचा फैलाव होणार नाही. तोंडावर हात ठेवून खोकले, तर निश्चितपणे जंतुंचा फैलाव रोखण्यास मदत होऊ शकते.