दिवाळीदरम्यान शहर-उपनगरात दोन कुटुंबीयांनी केलेल्या अवयवदानामुळे सहा जणांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 06:38 AM2017-10-24T06:38:24+5:302017-10-24T06:38:26+5:30
मुंबई : दिवाळीदरम्यान शहर-उपनगरात दोन कुटुंबीयांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे सहा जणांना जीवनदान मिळाले आहे.
मुंबई : दिवाळीदरम्यान शहर-उपनगरात दोन कुटुंबीयांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे सहा जणांना जीवनदान मिळाले आहे. दोन ब्रेनडेड महिलांमुळे सहा जणांना नवसंजीवनी मिळाल्याने अवयवदानाविषयीची जनजागृती महत्त्वाची ठरत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
ठाण्याच्या ४६ वर्षीय गीता सोनावणे झोपेत असताना अचानक कोमात गेल्या. त्यांची मुलगी प्रांजल हिने आईचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. सोनावणे यांचे यकृत पुण्यातील ५९ वर्षांच्या रुग्णाला प्रत्यारोपित करण्यात आले. तर मूत्रपिंड अंधेरी येथील ५१ वर्षीय रुग्णाला प्रत्यारोपित करण्यात आले. तसेच, दुसरे मूत्रपिंड एका खासगी रुग्णालयाला पाठविण्यात आले. नवी मुंबईतील ५१ वर्षीय महिलेचे हृदय मुलुंड येथील ५० वर्षीय रुग्णाला प्रत्यारोपित करण्यात आले.