मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. पालिकेने नोटीस पाठवल्यानंतरही डोक्यावरील छप्पर जाण्याच्या भीतीने रहिवासी जीव मुठीत घेऊन तिथेच राहतात. परिणामी, इमारत दुर्घटनेत निष्पाप जीवांचा बळी जातो हा तिढा सोडवण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी गेल्यावर्षी पुढाकार घेतला होता. मात्र कोरणा काळात ही मोहीम थंडावली. त्यामुळे पालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील ४५८ इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले. यापैकी १४८ इमारती पाडण्यात आल्या आहेत. तर उर्वरित ३१० इमारतींमध्ये आजही रहिवाशी राहत आहेत. मुंबईतील अनेक ठिकाणी इमारतीचा पुनर्विकास सुरू झाल्यानंतर काम अर्धवट सोडून विकासक पळ काढतात. तर अनेकवेळा अशा इमारतींच्या मालकांकडून महापालिकेच्या कारवाईवर न्यायालयातून स्थगिती आणण्यात येते. त्यामुळे स्थगिती मिळालेल्या प्रकरणांचा पालिकेमार्फत पाठपुरावा केला जात आहे.
सारे काही कळते, पण कुठे?मुंबईत जागा मिळवणं किती अडचणींचं आहे. त्यात रहिवाशांचे पुनर्वसन जवळपासच्या विभागांमध्ये केले जात नाही. त्यामुळे गैरसोय होते. - मनोहर राणे, रहिवाशी
मुलांच्या शाळा, नोकरी धंदे येथेच आहेत. आता दुसरीकडे पाठवलं तर ही घडी परत कशी बसणार. मुलांचे हाल होणार. जागा सोडली तर येथील फक्त पण गेला. हा धोका कोण पत्करेल.- विशाल श्रीवास्तव, रहिवाशी