मुंबई : मुंबईतील रहिवासी आहेत. मात्र, सध्या शिक्षण, नोकरी, उद्योग किंवा व्यवसायांमुळे परदेशात गेलेल्या ७९२६ जणांनी सात वर्षांत इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसेन्स काढलेले आहेत. वडाळा आरटीओ कार्यालयातून हे लायसेन्स वितरित झाले आहेत. लायसेन्सधारकांची संख्या ७९२६ असली तरी परदेशात असलेल्या भारतीयांची संख्या त्या तुलनेत खूप आहे. मात्र, जे परदेशातच स्थायिक झालेले आहेत त्यांनी तेथूनच लायसेन्स काढलेले आहे. खास करून शिक्षण व नोकरीनिमित्त परदेशात गेलेले दरवर्षी हे लायसेन्स नवीन काढतात. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत १८७ जणांनी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसेन्स काढलेले आहे.
शिक्षण आणि नोकरीच्या कारणामुळे अनेक व्यक्ती विदेशात जातात. यांपैकी काही व्यक्ती इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओकडे सादर करतात. अवघ्या ७२ तासांत प्रकरणे निकाली काढून वाहन चालविण्याचा परवाना दिला जात आहे. त्यामुळे या व्यक्तींना परदेशातही वाहतुकीचे नियम पाळत वाहन चालविण्याची मुभा मिळाली आहे. २०१४ ते २०२१ या कालावधीत ७९२६ जणांनी हे लायसेन्स काढले आहे. इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी पूर्वी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जायचे; पण आता शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून ऑनलाइन पद्धतीने आवेदन स्वीकारले जात आहेत. आवेदकाला कुठलीही अडचण येत असल्यास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी त्यांना योग्य मार्गदर्शन करीत आहेत.
किती जणांनी काढले इंटरनॅशनल लर्निंग लायसेन्स?
२०१५ -७००
२०१६ -१२००
२०१७ -१५४१
२०१८ -१९२२
२०१९ -१९६९
२०२० -४०७
२०२१ (जूनपर्यंत) -१८७
मुदत एक वर्षाचीच
परदेशातील लायसेन्सची मुदत फक्त एक वर्षाची असते. दरवर्षी नूतन लायसेन्स काढावे लागते. स्थानिक पातळीवर मात्र प्रथम दिलेल्या लायसेन्सची मुदत २० वर्षे असते, त्यानंतर दर पाच वर्षांनी त्याचे नूतनीकरण करायचे असते. परदेशातील लायसेन्सला मात्र दरवर्षी नव्यानेच प्रक्रिया करावी लागते. परदेशातील लायसेन्ससाठीही काही देशांचे आरक्षण असते.
तुम्हालाही काढायचेय इंटरनॅशनल लायसेन्स?
परदेशातील लायसेन्स काढायचे असेल तर त्याला व्हिसा, पासपोर्ट व स्थानिक पातळीवर काढलेले मूळ लायसन्स व फोटो आदी कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यासाठी एक हजार रुपये शुल्क आकारणी केली जाते. आधी काढलेल्या लायसेन्सवेळी कागदपत्रे सादर केलेली असतात, त्याशिवाय चाचण्याही झालेल्या असतात, त्यामुळे ही कागदपत्रे व चाचणीची गरज नसते. वरील तीन प्रकारची कागदपत्रे त्यासाठी आवश्यक असतात.
कोट
तुम्ही मुंबईला राहत असले तरी परदेशातील लायसेन्स काढता येते. त्यासाठी व्हिसा, पासपोर्ट व मूळ लायसेन्स, आदी कागदपत्रे लागतात. योग्य कागदपत्रे आणि शुल्क भरल्यानंतर एका दिवसातही हे लायसेन्स मिळते. मुंबईतून अनेकांनी हे लायसेन्स काढलेले आहे.
- वरिष्ठ अधिकारी, परिवहन विभाग