परवानगी न घेता मुंबईत राहणे महागात; नांदेडचे परिवहन अधिकारी शैलेश कामत यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:09 AM2020-05-18T05:09:00+5:302020-05-18T05:09:18+5:30

याबाबत परिवहन आयुक्त शेखर चन्ने म्हणाले की, मजुरांची वाहतूक करण्यासाठी नांदेडमध्ये राहणे गरजेचे असताना मेश्राम हे मुंबईत राहत होते.

Living in Mumbai without permission is expensive; Notice to Shailesh Kamat, Transport Officer, Nanded | परवानगी न घेता मुंबईत राहणे महागात; नांदेडचे परिवहन अधिकारी शैलेश कामत यांना नोटीस

परवानगी न घेता मुंबईत राहणे महागात; नांदेडचे परिवहन अधिकारी शैलेश कामत यांना नोटीस

Next

मुंबई : लॉकडाउन काळात परवानगी न घेता मुंबईत राहणे नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांना महागात पडले आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कामत यांनी यापूर्वी अंधेरी,ताडदेव आणि पेणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
याबाबत परिवहन आयुक्त शेखर चन्ने म्हणाले की, मजुरांची वाहतूक करण्यासाठी नांदेडमध्ये राहणे गरजेचे असताना मेश्राम हे मुंबईत राहत होते. त्यांनी रजा टाकणे किंवा पूर्व परवानगी घ्यायला हवी होती. परंतु त्यांनी तसे केले नाही. त्यांचा कार्यभार उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवर सोपविला असून कामत यांना नोटीस बजावली आहे. याबाबत चौकशी सुरू असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

Web Title: Living in Mumbai without permission is expensive; Notice to Shailesh Kamat, Transport Officer, Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई