Join us

धकाधकीचे आणि तणावपूर्ण आयुष्य असल्याने तरुणांमध्ये हृदयाचे झटका येण्याचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:06 AM

मुंबई : आजघडीला २० ते ४० वयोगटातील व्यक्ती सध्या हृदयाच्या आजाराने पीडित आहेत. सध्याचे आयुष्य धकाधकीचे आणि तणावपूर्ण असल्याने ...

मुंबई : आजघडीला २० ते ४० वयोगटातील व्यक्ती सध्या हृदयाच्या आजाराने पीडित आहेत. सध्याचे आयुष्य धकाधकीचे आणि तणावपूर्ण असल्याने तरुणांमध्ये हृदयाचे झटका येण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. याचे मुख्य कारण व्यसनाधीनता आहे. जसे की, सिगारेट, धूम्रपान आणि दारूचे सेवन. शरीरयष्टी बनविण्यासाठी अतिरिक्त स्टेरॉईडचा वापर आणि कोकेन या सर्व गोष्टींमुळे कमी वयात हृदयाचा झटका येऊ शकतो, असे हृदयविकार तज्ज्ञांनी सांगितले.

हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अमित पाटील म्हणाले की, हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण सध्या तरुणामध्ये वाढताना दिसून येत आहे. यात चाळिशीच्या आत असणाऱ्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. याचे मुख्य कारण व्यसनाधीनता आहे. जसे की, सिगारेट, धूम्रपान आणि दारूचे सेवन. शरीरयष्टी बनविण्यासाठी अतिरिक्त स्टेरॉईडचा वापर आणि कोकेन या सर्व गोष्टींमुळे कमी वयात हृदयाचा झटका येऊ शकतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती, झोपेच्या आणि खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा हे सुद्धा हृदयविकाराचा झटका येण्यामागील कारण ठरतेय. पोस्ट कोविड रुग्णांमध्ये शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होत असल्यानेही हृदयावर परिणाम होऊ शकतो. हृदयाचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी नियमित किमान ३० मिनिटे व्यायाम करावा, पौष्टिक आहारचे सेवन करावे, जंकफूडचे सेवन करणे शक्यतो टाळावे.

हृदयविकार तज्ज्ञ डॉ. नारायण गडकर म्हणाले की, २० ते ४० वयोगटातील व्यक्ती सध्या हृदयाच्या आजाराने पीडित आहेत. सध्याचे आयुष्य धकाधकीचे आणि तणावपूर्ण असल्याने तरुणांमध्ये हृदयाचे झटका येण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. आर्थिक समस्या, कौटुंबिक प्रश्न, कामाचा ताण हे यामागील मुख्य कारण आहे. याव्यतिरिक्त मधुमेह आणि उच्च रक्तदाब हृदयविकाराला आमंत्रण देत आहे. लठ्ठपणामुळे हृदयावर अतिरिक्त भार येत असल्याने हृदयाचे आरोग्य बिघडू शकते. याशिवाय लॉकडाऊनमुळे घरातच राहावे लागत असल्याने शारीरिक हालचाल मंदावली आहे, हे देखील हृदयाचा झटका येण्याचे एक कारण आहे. हृदयाचा झटका येण्याआधी काही लक्षणे दिसून येतात. जसे की, छातीत दुखणे. परंतु, बहुतेक लोक याकडे दुर्लक्ष करतात. याशिवाय कुटुंबात एखाद्या सदस्याला हृदयविकाराचा त्रास असल्यास पुढच्या पिढीला हा त्रास होऊ शकतो. म्हणून हृदयाचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. मद्यपान आणि धूम्रपान करू नये.