LMOTY 2020 : अनिल देशमुखांकडून पोलिसांना धीर; करून दिली केलेल्या कर्तृत्वाची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 05:47 PM2021-03-18T17:47:58+5:302021-03-18T17:49:25+5:30
LMOTY 2020 : शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या महिला पोलिस संध्या शिलावंत यांनी कोरोना काळात सहा कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. ही बाबा कौतुकास्पद आहे.
सचिन वाझे प्रकारणानंतर पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा कोरोना काळात राज्यभरात अहोरात्र पोलिसांनी केलेल्या उत्तम कार्याची आठवण करून दिली. कोरोना काळात पोलीस दल रस्त्यावर उतरले, परप्रांतीयांना मदत केली अशा प्रकारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांचे मनोधैर्य वाढवले. तसेच एक मुंबईतील किस्सा सांगितला की, कोरोना काळात जून महिन्यात निसर्ग वादळाचा तडाखा मुंबईला बसणार होता. रस्त्यावर कोणीही उतरलं नव्हतं. त्यावेळी ए पॉसिटीव्ह रक्ताची तातडीने हिंदुजा रुग्णालयात गरज होती. लहान मुलीच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी हे रक्त हवे होते. त्यावेळी ताडदेव पोलिस ठाण्याच्या API आकाश जाधव मदतीसाठी धावून गेले आणि ए पॉसिटीव्ह रक्तदान केले. त्यामुळे लहान मुलीवर हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. तर कोरोना जास्त प्रादुर्भाव असतानाच्या काळात नातेवाईक देखील मृतदेहाला पाहायला येत नव्हते. शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या महिला पोलिस संध्या शिलावंत यांनी कोरोना काळात सहा कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. ही बाबा कौतुकास्पद आहे.
अशाप्रकारे पोलिसांच्या चांगल्या कामगिरीची आठवण अनिल देशमुख यांनी करून दिली. अलीकडच्या काळात सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलीस दलात गदारोळ माजला आहे. त्यात पोलिसांचे खच्चीकरण विरोधी पक्षांकडून होत असल्याचं देशमुख म्हणाले. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार(Lokmat Maharashtrian of the Year Awards) सोहळ्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. मुंबई पोलीस(Mumbai Police) दलाने कोरोना काळात अतिशय उत्तमरित्या काम केले आहे, पोलीस दिवसरात्र मेहनत घेत होते, देशात महाराष्ट्र पोलिसांची चांगली प्रतिमा आहे. काही अधिकाऱ्यांच्या हातून चुका होतात, त्या यापुढे होऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल असं सांगत त्यांनी सचिन वाझे प्रकरणावर जास्त बोलणं टाळलं, परंतु या प्रकरणामुळे आपण राजीनामा देणार का? या प्रश्नावर त्यांनी थेट नाही असं उत्तर दिलं, माझा राजीनामा घेतला जाणार नाही, घटना घडत राहतात असं देशमुखांनी म्हटलं आहे.
LMOTY 2020 : "सुशांत सिंग राजपूत प्रकरणी ८ महिन्यात CBI कडून उत्तर नाही"https://t.co/ZwVUZiMOtd
— Lokmat (@MiLOKMAT) March 18, 2021
उद्धव ठाकरेंनी फोन करून २०१८ मध्ये माझ्यावर दबाव टाकल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता, आता...#SachinVaze@AnilDeshmukhNCP@Dev_Fadnavis#UddhavThackerayhttps://t.co/V4jI5w7OXU
— Lokmat (@MiLOKMAT) March 18, 2021