LMOTY 2022: समाजसेवेचा वसा! 'फिनोलेक्स'ला CSR श्रेणीतील 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 10:36 PM2022-10-11T22:36:40+5:302022-10-11T22:37:16+5:30
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) श्रेणीत फिनोलेक्स इंडस्ट्री लिमिटेड कंपनीला सन्मानित करण्यात आलं.
मुंबई-
सामाजिक भान जपत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग दाखवण्यात देशातील विविध कंपन्यांचा देखील महत्वाची भूमिका असते. सामाजिक उपक्रमांना अर्थसहाय्याच्या माध्यमातून दुर्बल घटकांना प्रगतीच्या मार्गावर आणण्याची आणि समाजसेवाचा वसा जपणाऱ्या कंपनीचा सन्मान लोकमत 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्कार सोहळ्यात करण्यात आला. उत्तम दर्जाचे पाईप्स आणि फिटिंग्ज बनवण्यात गेल्या ४० वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या 'फिनोलेक्स इंड्रस्टी लिमिटेड' कंपनीला सीएसआर श्रेणीत 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मुंबईत आज दिग्गजांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला.
'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सीएसआर श्रेणीत यावेळी फिनोलेक्ससह इन्फिनिटी रिटेल लिमिटेड (क्रोमा), कानसाई नेरोलॅक पेंट्स, svkm's nmims आणि lupin limited यांना नामांकन प्राप्त झालं होतं. यात फिनोलेक्स इंडस्ट्री लिमिटेड कंपनीने बाजी मारली असून पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे.
सीएसआर क्षेत्रात फिनोलेक्स इंडस्ट्रीने प्रत्येक व्यक्तीमध्ये जग बदलण्याची शक्ती आहे या विश्वासातून जन्मलेल्या सामाजिक जबाबदारीचे मुख्य तत्वज्ञान जोपासले आहे. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. शिक्षण, आरोग्यसेवा, समाजकल्याण, कौशल्य विकास आणि इतर काही क्षेत्रांमध्ये कंपनी मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सरकारने अनिवार्य केल्याच्या खूप आधीपासून फिनोलेक्सने बदल घडवण्याच्या प्रामाणिक आग्रहाने प्रेरित होऊन काम केले आहे. फिनोलेक्सने १६ पैकी १४ CSR आदेशांची पूर्तता केली आहे. यात गरिबी आणि भूक दूर करणे, असमानता आणि सामाजिक अन्याय कमी करणे, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता पुरवठा वाढवणे या कामांचा समावेश आहे.
फिनोलेक्स इंडस्ट्रीच्या माध्यमातून गेल्या ५ वर्षात १८,८६४ झाडे लावली गेली आहेत. कोविड काळात विषाणू प्रसाराच्या दोन्ही लाटांमध्ये एकूण २२६ वैद्यकीय उपकरणं पुरवली आहेत.