LMOTY 2022: 'चाळीतल्या मुलाला गृहनिर्माणमंत्री करणाऱ्या शरद पवारांना हा पुरस्कार अर्पण'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 08:33 AM2022-10-12T08:33:12+5:302022-10-12T08:36:18+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

LMOTY 2022: 'This award is dedicated to Sharad Pawar, who made a 40-year-old boy the Housing Minister', Says Jintendra Awhad | LMOTY 2022: 'चाळीतल्या मुलाला गृहनिर्माणमंत्री करणाऱ्या शरद पवारांना हा पुरस्कार अर्पण'

LMOTY 2022: 'चाळीतल्या मुलाला गृहनिर्माणमंत्री करणाऱ्या शरद पवारांना हा पुरस्कार अर्पण'

googlenewsNext

मुंबई - महाराष्ट्राच्या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले अशा महाराष्ट्रीयांची दखल घेत 'लोकमत'ने सुरू केलेला सन्मान म्हणजे, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. लोकसेवा, समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येते. या सोहळ्यात राजकारणातील कामगिरीबद्दल राष्ट्रवादी काँग्रसे नेते जितेंद्र आव्हाड यांना मोस्ट इंम्पॅक्टफूल पॉलिटीशिन हा विशेष पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर, आव्हाड यांनी व्यासपीठावरुनच हा पुरस्कार शरद पवार यांना समर्पित केला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी जितेंद्र आव्हाडांना 'मोस्ट इम्पॅक्टफूल पॉलिटीशन ऑफ द इअर' हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आव्हाडांनी विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक टीका केली. जितेंद्र आव्हाड यांनी आपला पुरस्कार शरद पवार, गृहनिर्माण खाते आणि सर्व कर्मचाऱ्यांना समर्पित केला. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून एका बैठकीचाही उल्लेख केला.

ज्या माणसाने मला इथपर्यंत पोहोचवलं, एका चाळीत राहणाऱ्या चाळकऱ्याला गृहनिर्माणमंत्री केलं, त्या शरद पवारांना हा पुरस्कार अर्पण करतो, असे आव्हाड यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हटले. 

आव्हाडांची कोपरखळी

यावेळी आव्हाड म्हणाले की, 'महाविकास आघाडी सरकारमध्ये माझ्याकडे गृहनिर्माण खाते होते. पण, आता गृहनिर्माण खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले आहे. मागच्या आठवड्यातच माझी विद्यमान गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत म्हाडाच्या कामाबाबत बैठक झाली. सध्या राज्यात स्थगिती सरकार आले आहे, पण फडणवीसांनी माझ्या 52 प्रकल्पांपैकी एकाही प्रकल्पाला स्थगिती दिली नाही, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो,' अशी टीका आव्हाडांनी केली.

Web Title: LMOTY 2022: 'This award is dedicated to Sharad Pawar, who made a 40-year-old boy the Housing Minister', Says Jintendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.