LMOTY 2022: २०१९ ची चूक सुधरायला अडीच वर्ष का लागली? नानांच्या खोचक प्रश्नावर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 09:15 PM2022-10-11T21:15:09+5:302022-10-11T21:15:53+5:30

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: एकनाथ शिंदे यांनी २०१९ मध्ये जे व्हायला पाहिजे होतं, ते आम्ही तीन महिन्यांपूर्वी केलं, असं म्हटल्यावर २०१९ ची चूक सुधरायला अडीच वर्ष का लागली? असा प्रश्न नाना पाटेकर यांनी विचारला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ काळ जुळून यावी लागते, असं उत्तर दिलं.

LMOTY 2022: Why did it take two and a half years to correct the mistake of 2019? Eknath Shinde's big statement on Nana Patekar's provocative question, said... | LMOTY 2022: २०१९ ची चूक सुधरायला अडीच वर्ष का लागली? नानांच्या खोचक प्रश्नावर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले...

LMOTY 2022: २०१९ ची चूक सुधरायला अडीच वर्ष का लागली? नानांच्या खोचक प्रश्नावर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले...

Next

मुंबई - आज मुंबईत रंगलेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांनी घेतलेली महामुलाखत ही खास आकर्षण ठरली. या मुलाखतीदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०१९ मध्ये जे व्हायला पाहिजे होतं, ते आम्ही तीन महिन्यांपूर्वी केलं, असं म्हटल्यावर २०१९ ची चूक सुधरायला अडीच वर्ष का लागली? असा प्रश्न नाना पाटेकर यांनी विचारला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ काळ जुळून यावी लागते, असं उत्तर दिलं.

या मुलाखतील एकनाथ शिंदे म्हणाले की, नानांनी व्यक्त केलेल्या भावना योग्य आहेत. तीन महिन्यांपूर्वी आम्ही जे काही केलं ते तुमचा आदर आणि मतदारांचा आदर केला आहे. तो २०१९ ला व्हायला हवा होता. तेव्हा आम्ही शिवसेना भाजपा युती म्हणून लढलो होतो. आम्हाला बहुमत मिळालं होतं. भाजपाचे १०० हून अधिक आणि शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले होते. सगळ्या मतदारांना वाटलं होतं की बहुमताप्रमाणे सरकार स्थापन होईल. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. पण आम्ही तीन महिन्यांपूर्वी ते केलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावर नाना पाटेकर यांनी हे करायला अडीच वर्ष का लागली असा प्रश्न विचारला.

या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, कारण या सगळ्या गोष्टी घडवून यायला योग्य योग वेळ यावी लागते. मधल्या काळात कोविड होता. त्या काळात असं काही केलं असतं तर कोविड असताना असं का करताहेत असा प्रश्न विचारला गेला असता. त्या काळात आम्ही प्रयत्न करत होतो. अखेर तीन महिन्यांपूर्वी आम्ही तुमच्या मताचा आदर केला, असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं. 

दरम्यान, सरकार हे फेसबुक लाईव्हवर बनवता येत नाही. म्हणून आम्ही कोविड संपला आणि एकत्र आलो आणि फिजिकल सरकार स्थापन केलं, असा टोला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. 

Read in English

Web Title: LMOTY 2022: Why did it take two and a half years to correct the mistake of 2019? Eknath Shinde's big statement on Nana Patekar's provocative question, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.