Join us

LMOTY 2022: झंडा उँचा रहे हमारा... रणवीरच्या उत्साहाने लोकमतच्या सोहळ्यात भरला देशक्तीचा रंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 10:00 AM

रणवीर सिंगला ८३ या चित्रपटातील कपिल देवच्या भूमिकेबद्दल लोकमततर्फे पुरस्कार देण्यात आला

मुंबई - लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबईत रंगला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, प्रशासन, उद्योग अशा विविध श्रेणीतील मान्यवरांना महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात येते. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याला सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीतील 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर येताच रणवीर सिंग थेट नाना पाटेकरांच्या पाया पडला. त्यानंतर नानांनी त्याला मिठ्ठी मारली. रणवीरचा उत्साह लोकमतच्या स्टेजवरुन महाराष्ट्र पाहात होता, त्यावेळी, तिरंगा हाती घेऊन रणवीरने जोशपूर्ण गाणेही गायले. रणवीरच्या या जोशमध्ये नानाही सहभागी झाले होते. 

रणवीर सिंगला ८३ या चित्रपटातील कपिल देवच्या भूमिकेबद्दल लोकमततर्फे पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे, स्टेजवर रणवीरसिंगने तिरंगा हाती घेऊन ८३ चित्रपटातील देशभक्तीवरील गाणे गायले. यावेळी, अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह दिग्गज नेतेही व्यासपीठावर होते. जितेगा जितेगा... इंडिया जितेगा... हे गाणे गाताना रणवीरसिंगाचो जोश सर्वानाच थक्क करणारा होता. आपल्या जोशात त्याने तिरंगा ध्वज फडकवत गाणं गायलं. त्यामुळे संपूर्ण सभागृहात देशभक्तीचं वातावरण निर्माण झाले होते. तर, अनेकांना रणवीरच्या चित्रपटातील गाण्याची आणि त्याने चित्रपटात फडकवलेल्या तिरंग्याचीही आठवण झाली. 

नानांना पाहून अभिनय शिकलो

तो पुढे म्हणाला की, मी नानांना पाहून अभिनय करायला शिकलो, आज त्यांच्या समोर मला हा पुरस्कार स्वीकारण्यात खरोखर अभिमान वाटतो. मला तुमचा खूप आदर वाटतो आणि आज मी तुमच्यासोबत मंचावर उभा आहे, त्यामुळे मी खूप खूश आहे. कलाविश्वाला तुम्ही दिलेल्या योगदानासाठी मी तुमचे आभार मानतो. क्रांतीवीर चित्रपटातील मला तुमची गाणी खूप आवडली होती. त्यावेळी त्याने नाना पाटेकर यांना विचारलं की तुम्हाला हा चित्रपट आठवतो का त्यावर नाना पाटेकर मजेशीर अंदाजात म्हणाले की, मुझे भुलना अच्छा लगता है... असं नानांनी म्हणताच सर्वांना हसू आवरलं नाही. 

टॅग्स :रणवीर सिंगनाना पाटेकरलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2022