Join us

LMOTY 2023: भाजपाच्या श्वेता महाले यांना ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 7:17 PM

चिखली-बुलढाणाच्या आमदार श्वेता महाले यांचा राजकारण (पदार्पण) क्षेत्रातील कार्यासाठी सन्मान

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023:लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने दरवर्षी वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना गौरवण्यात येते. या पुरस्कारासाठीची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली होती.

राजकारण (पदार्पण) (Debutant Politician) या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळाले होते. यंदाच्या म्हणजेच २०२३ च्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’च्या राजकारण (पदार्पण) क्षेत्रात चिखली-बुलढाणाच्या भाजपा आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) या सन्मानाच्या मानकरी ठरल्या. त्यांना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार सचिन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बुलढाणा जिल्हा परिषद ते आमदार असा श्वेता महाले यांचा प्रवास आहे. जिल्हा परिषदेतील कामाच्या जोरावर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून त्यांना चिखली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. अभ्यासू आणि आक्रमक नेत्या अशी त्यांची ओळख झाल्याने त्यांच्यावर पक्षाने दिल्लीच्या मॉडेल टाउन आणि सदर बाजार या दोन मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती.

महिलांच्या आत्मसन्मानासाठी आई, बहिणींवरून देण्यात येणाऱ्या शिव्यांना गुन्हा ठरवून त्यांना ॲट्रॉसिटींतर्गत आणण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. ग्रामीण भागातील सुमारे ४ हजार गरोदर महिलांना त्यांनी डाळिंब, चिकू, केळी, टरबूज, पपई आणि खरबूजचे पाकिटे घरपोच पुरवली. या महिलांना सकस आहार मिळावा यासाठी त्यांनी हे काम केले, तसेच त्यामुळे फळे विक्रेत्यांकडून फळे घेऊन त्यांचे होणारे आर्थिक नुकसानही त्यांनी टाळले. याशिवाय आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलींचे कन्यादानही त्यांनी केले आहे.

टॅग्स :भाजपालोकमतमुंबई