राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येते. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली होती. इंडस्ट्री अँड बिझनेस या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळाले होते. यंदा म्हणजेच २०२३ च्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचे मानकरी वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचे अध्यक्ष आणि आमदार डॉ. विनय विलासराव कोरे हे ठरले आहेत.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यामध्ये लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्कारानं गौरवण्यात आले.
आमदार डॉ. विनय कोरे हे वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचे अध्यक्ष आहेत. २०२१ ते २०१६ या सालासाठीची संचालक मंडळाच्या जागांसाठी ही निवडणूक कोरे यांच्या नेतृत्वाखाली सातव्यांदा बिनविरोध झाली. विनय कोरे हे राज्यातील माजी मंत्रीही राहिले आहेत. तसंच तसंच ते जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्षदेखील आहेत.