LMOTY 2024 : आयएएस अधिकारी भूषण गगराणी यांचा लोकमतकडून मानाच्या विशेष पुरस्काराने गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 07:33 PM2024-02-15T19:33:58+5:302024-02-15T19:37:22+5:30
Lokmat Maharashtrian of the year awards 2024 : गगराणी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सीएमओत प्रधान सचिवपद सांभाळले होते. तर उद्धव ठाकरे सरकारमध्ये कोरोना काळात खूप मोठी जबाबदारी पार पाडली होती.
संपूर्ण राज्याचे आकर्षण असणाऱ्या लोकमतमहाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२४ सोहळ्याला सुरुवात झाली आहे. राज्यात सरकार कोणाचीही असो, भारतीय प्रशासनिक सेवा अधिकारी भूषण गगराणी प्रशासनाच्या महत्वाच्या भुमिकेत असतात. या भूषण गगराणींना लोकमतकडून मानाच्या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
गगराणी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सीएमओत प्रधान सचिवपद सांभाळले होते. तर उद्धव ठाकरे सरकारमध्ये कोरोना काळात खूप मोठी जबाबदारी पार पाडली होती. यामुळे शिंदे सरकारच्या काळात त्यांच्यावर अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
संपूर्ण राज्याचे आकर्षण असणाऱ्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२४ सोहळ्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये समाजसेवा, आयएएस (प्रॉमिसिंग), आयपीएस (प्रॉमिसिंग), क्रीडा, शिक्षक, वैद्यकीय, कृषी, उद्योग आणि राजकारण या कॅटेगरीमधून राज्यभरातून नामांकने आली आहेत. महाराष्ट्राच्या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले अशा महाराष्ट्रीयांची दखल घेत ‘लोकमत’ने सुरू केलेला सन्मान म्हणजे, ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार आहे.
आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघंही मुरब्बी, अनुभवी आणि अभ्यासू नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यामुळे 'गुगली' किंवा 'बाउन्सर' प्रश्नांचा ते एकत्र सामना कसा करतात, 'फ्रंट फुट'वर खेळतात की 'डिफेन्स'चा आधार घेतात, पडद्यामागचे काही किस्से सांगतात की काही नवे गौप्यस्फोटच करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.