Join us

LMOTY 2024: दिव्यांगांसाठी ‘स्वाधार’! हरिश्चंद्र सुडे यांना समाजसेवा क्षेत्रातील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 6:50 PM

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडला.

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडला.

राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येते. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली होती. लोकसेवा-समाजसेवा विभागात यंदा पाच जणांना नामांकनं मिळाली होती. दरम्यान, दिव्यांगांना स्वावलंबी बनवणाऱ्या हरिश्चंद्र सुडे यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' २०२४ या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

हरिश्चंद्र सुडे यांच्याविषयी...

ग्रामीण अध-अपंग पुनर्वसनाचा स्वाधार या नावीन्यपूर्ण प्रकल्पाच्या माध्यमातून ४० वर्षापासून शेकडो अध-अपंगांना स्वयंरोजगार मिळवून देऊन त्यांना स्वावलंबी बनविणारे लातूर जिल्ह्यातील बुधोडा येथील हरिश्चद सुहे हे विकलागांसाठी जणू देवदूत समजले जातात. दरवर्षी स्वाधार संस्थेच्या हातमाग केंद्रात जुन्या एक लाख पॉलिस्टर साड्यांचे रिसायकलिंग करून सुबक सतरंज्या बनविल्या जातात. एक्यूप्रेशरचे आधुनिक प्रशिक्षण केंद्र प्रथमच अंधासाठी उभारले. ३०० पेक्षा अधिक अंधांना त्यांचे प्रशिक्षण मिळाले आहे. त्यानंतर ते स्वावलंची झाले. या केंदात वेदनेनं त्रस्त रुग्णाना प्रतिक्षण घेतलेले अंध चिकित्सक एक्युप्रेशर, मसाज व निसर्गोपचाराच्या माध्यमातून उपचार देतात. महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक अंध युवकानी या केदात प्रशिक्षण घेतले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' २०२४ च्या सुपर ज्युरिंमध्ये लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, लोकमत मीडिया प्रा.लि.चे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मुंबई पोलीस विशेष आयुक्त देवेन भारती, पद्मश्री सोनू निगम, एव्हेन्यू सुपरमार्ट्स लि. चे अध्यक्ष रमेश दमाणी, एमक्योर फार्मा लिमिमटेडच्या कार्यकारी संचालक नमिता थापर, शास्त्रीय गायक आणि राष्ट्रीय पुस्कार विजेते महेश काळे, नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर, इन्स्टिट्युट ऑफ गॅस्ट्रो सायन्स रिलायन्स हॉस्पीटलचे पद्मश्री अमित मायदेव, आदर्श गाव कार्यक्रम हिवरे बाजारचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, बालकृष्ण इंडस्ट्रिज लि. चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार यांचा समावेश होता.

टॅग्स :लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024