Join us

LMOTY 2024: तंत्रस्नेही शिक्षक! आनंदा आनेमवाड यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 6:44 PM

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा गुरुवारी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडला.

मुंबई - राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी 'लोकमतमहाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येते. 'लोकमतमहाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली होती. शिक्षक श्रेणीमध्ये पाच जणांना नामांकन मिळाले होते. यात यंदा म्हणजेच २०२४ च्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचे आनंदा आनेमवाड ( Anand Anemwad, Zilla Parishad School, Dahanu, Palghar) हे मानकरी ठरले आहेत.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्यांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा गुरुवारी मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे पार पडला. यामध्ये लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्कारानं गौरवण्यात आले.

कातकरी, वारली भाषेतून मराठी भाषेकडे द्विभाषा शब्दकोश बनवून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत इंग्रजी तोंडओळख नसणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुभाषिक करणारे शिक्षक आनंदा बालाजी आनेमवाड यांनी वाटचाल पथदर्शी आहे. ते पावन, मल्लायण आणि आता महालपाडा येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ज्यामुळे अनुपस्थितीची कारणे समोर आली. कर्ज काढून मुलांसाठी लॅपटॉप आणि इतर साहित्य खरेदी करुन विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या दिशेने नेले. स्थलांतराची समस्या हंगामी वसतिगृह उभारुन सोडविली. आपली शाळा नव्हे, तर तालुक्यातील सर्वच शाळा डिजिटल व्हाव्यात. यासाठी १०० शिक्षकांची कार्यशाळा घेतली. शासनाच्या शिक्षणवारी उपक्रमाद्वारे २० हजार शिक्षकांना मार्गदर्शन करणारे आनेमवाड हे तंत्रस्नेही शिक्षक म्हणून परिचित आहेत. 

यंदाच्या पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सुपर ज्युरी मंडळात डॉ. विजय दर्डा, सुधीर मुनगंटीवार, धनंजय मुंडे, देवेन भारती, सोनू निगम, रमेश दमाणी, नमिता थापर, महेश काळे, डॉ. विजय भटकर, डॉ. अमित मायदेव, पोपटराव पवार, राजीव पोद्दार आणि ऋषी दर्डा यांचा समावेश होता.  

टॅग्स :लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024मुंबईमहाराष्ट्रशिक्षकलोकमत