Join us

तुमच्या नावावर दुसरेच कोणी कर्ज घेत नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 2:41 PM

loan Fraud: तुमच्या नावावर दुसरे कोणी बँकेचे कर्ज तर घेत नाही ना याची तपासणी करणे आवश्यक आहे. 

मुंबई - प्रत्येकालाच कधी ना कधी कर्जाची आवश्यकता असते. कर्ज काढण्यासाठी अनेक जण विविध पर्याय शोधतात. बँकेसह, पतसंस्था, बचत गट तसेच क्रेडिट कार्ड सह विविध खासगी संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी धडपड सुरू असते. मात्र असे कर्ज घेताना आपले कागदपत्र दुसऱ्या व्यक्तीच्या हाती सोपवून त्याचा दुरुपयोग तर केला जाणार नाही ना? याची तपासणी होणे आवश्यक आहे. तुमच्या नावावर दुसरे कोणी बँकेचे कर्ज तर घेत नाही ना याची तपासणी करणे आवश्यक आहे. 

ॲपपासून सावधान...कोणत्याही अनोळखी कंपनी किंवा नवीन कर्ज देणाऱ्या लोन ॲपच्या माध्यमातून कर्ज घेऊ नये. संबंधिताकडे कोणतीही कागदपत्रे ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने सादर करू नयेत. जेणेकरून त्याचा  दुरुपयोग होणार नाही. 

तर आपण तक्रार करू शकतो...आपण कोणकोणत्या बँकेचे कर्ज घेतले? त्यासाठी एकूण किती हप्ते भरले, सोबतच किती वर्षाची मुदत कर्जासाठी आहे. या सर्व बाबी क्रेडीट स्कोरमध्ये तपशीलवार दिसून येतात. आधार कार्ड, पॅन कार्ड व ईमेल आयडी मोबाइल यांच्याद्वारे ओटीपी टाकल्यानंतर अधिकृतरित्या सिबिल स्कोर तपासता येतो. यामध्ये काही संशयस्पद आढळल्यास आपण तक्रार करू शकतो. 

 मोबाइलवर आलेला एसएमएस किंवा लिंक याद्वारे सध्या वेगवेगळ्या लोन ॲपच्या माध्यमातून झटपट कर्ज देण्याच्या नावाखाली गोपनीय तपशील मिळविला जातो.  सोबतच कागदपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो आणि माहिती देतात. त्याचा दुरुपयोगही होऊ शकतो. त्यामुळे अशा लोन ॲप द्वारे पैसे कर्ज म्हणून घेणे टाळलेले बरे.   बँकेच्या वतीने बँकेच्या शाखेतच दिले जाणारे कर्ज रीतसर प्रक्रियेमध्ये घ्यावे. बँकेत शाखा अधिकारी, कर्ज विभाग यांच्याकडे आपली सर्व कागदपत्रे सादर करून प्रस्तावित कर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. कर्ज प्रकरणांमध्ये आपली फसवणूक होऊ नये यासाठी सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

चौकशी करा...आपण ज्या बँकेतून कर्ज घेतले तेथे किती हप्ते भरले, किती हप्ते बाकी आहेत, मुद्दल किती राहिली, व्याज किती शिल्लक आहे, यांची तपासणी करता येते.

टॅग्स :गुन्हेगारीधोकेबाजी