अल्पसंख्याक तरुणांना स्वयंरोजगारासाठी ५ लाख रुपयांचा कर्जपुरवठा, २५ कोटींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 03:42 AM2018-10-25T03:42:41+5:302018-10-25T03:42:43+5:30

अल्पसंख्याक समाजातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत करण्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे.

Loan of Rs. 5 lakhs for self-employment, 25 crore distributed for minority youth | अल्पसंख्याक तरुणांना स्वयंरोजगारासाठी ५ लाख रुपयांचा कर्जपुरवठा, २५ कोटींचे वाटप

अल्पसंख्याक तरुणांना स्वयंरोजगारासाठी ५ लाख रुपयांचा कर्जपुरवठा, २५ कोटींचे वाटप

googlenewsNext

- खलील गिरकर 
मुंबई : अल्पसंख्याक समाजातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत करण्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत प्रस्ताव मंजूर झाला असून मंजुरीसाठी हा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला आहे.
अल्पसंख्याक तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महामंडळाने ही नवीन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रिक्षा, खासगी चार चाकी वाहन, मालवाहतुकीसाठी छोटी वाहने खरेदी करण्यासाठी हे कर्ज देण्यात येईल. या कर्जासाठी ७ टक्के व्याज दर आकारण्यात येणार आहे. महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष हैदर आझम यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत चर्चा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना त्यांच्या पायावर सक्षमपणे उभे करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे आझम म्हणाले.
महामंडळातर्फे २०१७-१८ या कालावधीत राज्यभरातील १०६६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जापोटी २५ कोटी ४१ लाख १८ हजार २०० रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी महामंडळातर्फे जनजागृती केली जात आहे. यंदा किमान ८ ते १० हजार विद्यार्थ्यांना ३०० कोटी रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज देऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न केले जात असल्याची माहिती आझम यांनी दिली. औरंगाबादच्या १२० जणांना २६ लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. तर, गोंदिया जिल्ह्यात एकाही विद्यार्थ्याने अर्ज केलेला नसल्याने कुणालाही कर्ज देण्यात आलेले नाही. मुंबईत २९ जणांना ८० लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे.
>अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळणार
महामंडळातर्फे २०१७-१८ या कालावधीत राज्यभरातील १०६६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जापोटी २५ कोटी ४१ लाख १८ हजार २०० रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. यंदा किमान ८ ते १० हजार विद्यार्थ्यांना ३०० कोटी रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज देऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न केले जात आहे़

Web Title: Loan of Rs. 5 lakhs for self-employment, 25 crore distributed for minority youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.